पोटावरील वाढलेली चरबी लगेच गायब करेल हे फळ, लगेच खायला करा सुरूवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:20 AM2023-05-04T10:20:49+5:302023-05-04T10:21:09+5:30
Anjeer For Burning Belly Fat: तुम्ही जर वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्या हेल्दी मानल्या जातात. चला जाणून घेऊ बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही काय करावं.
Anjeer For Burning Belly Fat: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कारण चरबी वाढल्याने बॉडीचा शेपही बिघडतो. इतकंच नाही तर चरबी वाढल्याने वेगवेगळे आजारही होण्याचा धोका जास्त असतो. अशात तुम्ही जर वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्या हेल्दी मानल्या जातात. चला जाणून घेऊ बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही काय करावं.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर अंजीर
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज अंजीर खाणं सुरू करा. यात आयरन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. अंजीर तुम्ही कच्चंही खाऊ शकता.
असा होईल अंजीराचा फायदा
1) सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने पोटावरील चरबी वेगाने कमी होण्यास मदत मिळते. कारण अंजीर खाल्ल्यावर पोट भरलेलं राहतं आणि बराच वेळ भूक लागत नाही.
2) अंजीरमध्ये फिकिन नावाचं एक डायजेस्टिव एंजाइम असतं. जे अन्न लवकर पचवण्याचं काम करतं. यामुळे पोटासंबंधी समस्या होत नाही आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते.
3) जर अंजीराचा जास्त फायदा मिळवायचा असेल तर ते भिजवून खा. कारण यात फायबर भरपूर असतं, याने पचन तंत्र चांगलं राहतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते.
4) हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले अंजीर खाल तर यात आढळणारं ओमेगा 3 फॅटी अॅसिड कॅलरी बर्न करण्यात महत्वाची भूमिका बजावतं.