अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी घेतलं जाणारं 'हे' औषध किडनीसाठी घातक, कंपनीला दणका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 10:49 AM2019-11-07T10:49:02+5:302019-11-07T10:51:42+5:30

नव्या नियमानुसार, रॅपरवर ही सूचना देणं गरजेचं असेल की, याचा वापर किडनीसाठी अतिशय नुकसानकारक होऊ शकतो.

Antacids must carry kidney injury warning | अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी घेतलं जाणारं 'हे' औषध किडनीसाठी घातक, कंपनीला दणका!

अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी घेतलं जाणारं 'हे' औषध किडनीसाठी घातक, कंपनीला दणका!

Next

(Image Credit : irishmirror.ie)

अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी देशात सर्वात जास्त प्रमाणात एंटासिडचं सेवन केलं जातं. ही गोष्ट लक्षात घेऊन एंटासिडच्या विक्रीसंबंधी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमाचा मुख्य उद्देश रूग्णांची सुरक्षा वाढवणे हा आहे. नव्या नियमानुसार, एंटासिडच्या रॅपरवर ही सूचना देणं गरजेचं असेल की, याचा वापर किडनीसाठी अतिशय नुकसानकारक होऊ शकतो.

Times Of India ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील ड्रग्स कंट्रोल जनरल द्वारे मंगळवारी एक सूचना जारी करण्यात आली. त्यात सर्वच राज्य अधिकाऱ्यांना आणि प्रोटॉन पंप इनहेबिटर्सच्या प्रत्यक्ष निर्मात्यांना विचारण्यात आले की, एंटासिड बाजाराचा एक मोठा भाग आहे आणि भरपूर प्रमाणात लोक हे औषध घेतात. पण या औषधाचा वापर किडनीसाठी घातक होऊ शकतो, याबाबतची सूचना पॅकेजिंगवर दिली गेली पाहिजे. त्यासोबतच ज्या औषधांमध्ये पॅंटोप्राजोल, ओमेप्राजोल, लांसोप्राजोल, एसोमप्राजोल आणि त्यांचं मिश्रण आहे, त्यांच्या पॅकेजिंगवरही ही सूचना दिली जावी.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुद्द्यावर गेल्यावर काही महिन्यात अनेक तज्ज्ञांद्वारे मूल्यांकल आणि केस स्टडी केली गेली. ज्यात नॅशनल को-ऑर्डिनेशन सेंटर फॉर फार्माकोविजिलेंस प्रोग्रामचा सुद्धा समावेश आहे. गेल्या काही दिवसात अ‍ॅंटी-अ‍ॅसिडीक पिल्सवर झालेल्या ग्लोबल स्टडीजमध्ये ही बाब समोर आली आहे की, गॅस आणि जळजळ सारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या टॅबलेट्सचं जास्त काळासाठी सेवन केल्याने किडनी डॅमेज, एक्यूट रेनल डिजीज, क्रोनिक किडनी डिजीज आणि गॅस्ट्रिक कॅन्सरसारख्या समस्या होतात. पण हा रिसर्च नेफ्रॉलजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यामुळे अनेक चिकित्सकांना या औषधांच्या साइडइफेक्ट्सबाबत माहिती नसावं असं होऊ शकतं.

प्रोटॉन पंप इनहेबिटर(PPI) जगभरातील टॉप १० प्रिस्क्राइब्ड ड्रग्सच्या श्रेणीत आहे. जे अ‍ॅसिड आणि अपचन समस्या दूर करण्यासाठी घेतले जातात. पण ऑर्थोपेडिक्स, कार्डिओलॉजी, अंतर्गत चिकित्सा आणि सर्जरी सारख्या विशेष स्थितीमध्येही नियमित रूपाने याचा वापर केला जातो. याचा व्यवसाय ४ हजार ५०० कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.

अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी पीपीआयचा वापर साधारण २० वर्षांआधी सुरू झाला. तेव्हापासून हे औषध फार सुरक्षित असल्याची भावना आहे. पण यामुळे अनेकांना नुकसान झालं. त्यामुळेच या औषधांची विक्री कमी झाली आहे. याआधी यूएसमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ.प्रदीप अरोरा यांनी बीएमसी नेफ्रोलॉजीमध्ये रिसर्च प्रकाशित केला. ज्याबाबत त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, पीपीआय काही सूचनेसोबतच प्रिस्क्राइब्ड केलं जावं आणि हा कालावधी केवळ ८ आठवड्यांचा असला पाहिजे. जर यापेक्षा अधिक काळासाठी रूग्णाला पीपीआय घेण्याची गरज पडत असेल तर त्यांच्या किडनी फंक्शन आणि मॅग्नेशिअम लेव्हलवर लक्ष देण्याची गरज आहे.


Web Title: Antacids must carry kidney injury warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.