महागडे क्रीम वापरण्याऐवजी रोज खा ही 3 फळं, चेहऱ्यावर कधीच येणार नाही सुरकुत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:40 PM2023-05-30T15:40:22+5:302023-05-30T15:40:50+5:30
Anti-aeging Fruits : फळांमधील नॅच्युरल शुगर शरीरासाठी आवश्यक ऊर्जेची कमतरता भरून काढते. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये असे वाटत असेल तर महागडे क्रीम वापरण्याऐवजी काही फळं नियमित खावीत.
Anti-aeging Fruits : वेगवेगळ्या फळांचा आपल्या आरोग्याला किती फायदा होतो हे तुम्हाला माहीत आहेच. सोबतच या फळांमुळे आपल्या त्वचेलाही फायदा मिळतो. इतकंच काय तर काही फळं अशी आहेत जी रोज खाल्ली तर तुम्ही लवकर म्हातारे दिसणार नाहीत. म्हणजे या फळांनी अॅंटी-एजिंगची समस्या दूर होते.
फळांमधील नॅच्युरल शुगर शरीरासाठी आवश्यक ऊर्जेची कमतरता भरून काढते. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये असे वाटत असेल तर महागडे क्रीम वापरण्याऐवजी काही फळं नियमित खावीत. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तीन खास फळं फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊ कोणती आहेत ही फळे...
एवोकाडो
एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन के, सी, ई, बी आणि ए भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन ए चं प्रमाण अधिक असतं. याने त्वचेवरील मृत पेशी नष्ट करण्यास आणि नवीन पेशीचं निर्माण करण्यास मदत मिळते. यातील कॅरोटेनॉइडमुळे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या टॅनिंगपासूनही बचाव होतो.
सफरचंद
सफरचंद खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत. तसेच रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतं. सफरचंद सालीसोबतच खाणं अधिक फायदेशीर असतं. अनेकजण साल काढून टाकतात, जे चुकीचं आहे. कारण या सालीमध्ये अॅंटी-एजिंग तत्व असतात. तसेच याने आतड्यांमध्ये गुड एंजाइम्स वाढतात, ज्याने तुमच्या शरीरात पाणी नियंत्रित राहतं.
पपई
पपईमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. याचं सेवन केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते. सुरकुत्याही दूर होतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि त्वचेसाठी सर्वात फायदेशीर व्हिटॅमिन ई भरपूर असतात. त्यासोबतच कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम इत्यादीही आढळतात. पपईमध्ये असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यासही मदत करतात. याने वाढलेल्या वयाची लक्षणे त्वचेवर दिसत नाही.