पनीर खाल तर दिवसेंदिवस तरुणच दिसायला लागाल, जाणून घ्या पनीर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 06:33 PM2021-11-09T18:33:00+5:302021-11-09T18:36:00+5:30
ज्यांना मांसाहार वर्ज्य असतो त्यांच्यासाठी प्रथिनांचे जे स्रोत सांगितले जातात, त्यातला सर्वात उत्तम स्रोत पनीर आहे. पनीरच्या सेवनामुळे अनेक फायदे होतात. पण, पनीर हे योग्य प्रकारे सेवन करणं. गरजेचं असतं.
पनीर हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे. ज्यांना मांसाहार वर्ज्य असतो त्यांच्यासाठी प्रथिनांचे जे स्रोत सांगितले जातात, त्यातला सर्वात उत्तम स्रोत पनीर आहे. पनीरच्या सेवनामुळे अनेक फायदे होतात. पण, पनीर हे योग्य प्रकारे सेवन करणं. गरजेचं असतं.
आयुर्वेदानुसार, दुधापासून बनणाऱ्या ताक या एकमेव पदार्थाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दुग्धजन्य पदार्थात मीठ वर्ज्य करावं. कारण, त्याने शरीराची हानी होते. सध्या पनीर पासून बनणाऱ्या विविध पदार्थांना चांगली मागणी आहे. त्यात अनेक चविष्ट रेसिपींचा समावेश आहे. पण, त्या फारशा लाभदायक नाहीत असं आयुर्वेदिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पनीरसोबत काळ्या मिरीची पूड किंवा धणेपूड किंवा चाटमसाला टाकून खाता येतो. पण, मिठाचा वापर करू नये. वय वर्ष 20 पासून अधिक वय असलेल्यांनी रोज एक छोटी वाटी पनीर खावं. दररोज 100 ग्रॅम पनीर आरोग्यासाठी लाभदायक असतं. दिवसाच्या कोणत्याही वेळी ते खाता येतं, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी ते खावं.
पनीरमध्ये कॅल्शियमचा स्रोत देखील असतो. त्यामुळे तुमची त्वचा आणि केसांसाठी ते उपयुक्त ठरतं. तसंच हाडं देखील मजबू ठेवतं. पनीर खाल्ल्याने त्वचेचा घट्टपणा टिकून राहतो, त्यामुळे वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. सुरकुत्या पडू नयेत यासाठी शरीराला नियमित स्वरुपात कॅल्शियम आणि प्रथिनांची गरज असते. पनीर ती गरज पूर्ण करतं.
पनीर चेहऱ्याची चमक वाढवतं. कारण, यातील प्रथिने त्वचेच्या नवीन कोशिकांना निर्माण करण्याचं आणि जुन्या कोशिकांना दुरुस्त करण्याचा वेग वाढवण्याचं काम करतात. पनीरमध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्यामुळे त्वचेचा चमकदारपणा टिकून राहतो. तसंच त्वचेचं नुकसान भरून काढण्यासाठी देखील पनीर लाभदायक आहे. पनीर तुमच्या शरीरातील फॅट अजिबात वाढवत नाही. उलट त्यामुळे हाडांना योग्य वंगण मिळतं आणि हाडं तसंच सांधे बराच काळ सुस्थितीत राहतात.