लढ्याला यश! आता कोरोनाला शरीरात जाण्यापासून रोखणार एंटीबॉडी इनहेलर, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 11:36 AM2020-08-16T11:36:22+5:302020-08-16T11:41:34+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसमुळे पसरत असलेल्या माहामारीला रोखण्यासाठी नेजल स्प्रे सोपा आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. 

Anti corona nasal spray made by antibodies in american university of california | लढ्याला यश! आता कोरोनाला शरीरात जाण्यापासून रोखणार एंटीबॉडी इनहेलर, तज्ज्ञांचा दावा

लढ्याला यश! आता कोरोनाला शरीरात जाण्यापासून रोखणार एंटीबॉडी इनहेलर, तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसनं गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात हाहाकार निर्माण केला आहे.  जगभरातील तज्ज्ञ आणि डॉक्टरर्स कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी तसंच माहामारीचा प्रभाव कमी करण्याासाठी औषध, लसी विकसीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात तज्ज्ञांकडून एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकन तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार नॅनोबॉडीजयुक्त एंटी कोरोना स्प्रे तयार केला आहे. या स्प्रेचा वापर इनहेलरप्रमाणे करता येऊ शकतो. 

या स्प्रेचा वापर केल्यानंतर नॅनोबॉडीजमार्फत कोरोनाचे संक्रमण पसरवत असलेल्या व्हायरसला शरीरात पोहोचण्यापासून रोखता येऊ शकतं. यामुळे व्हायरस घश्यापर्यंत पोहोचूनही  शरीरात प्रवेश करू शकणार नाही. या नेजल स्प्रे च्या वापरानं कोरोना व्हायरसच्या प्रोटीन्सना ब्लॉक करता येऊ शकतं.  कोरोना व्हायरस प्रोटीन्सना ब्लॉक करत असलेला हा नेजल स्प्रे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी तयार केला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या इनहेलर स्प्रे तयार करण्यासाठी एंटीबॉडीजचा वापर करण्यात आला आहे. सगळ्यात आधी एंटीबॉडीजद्वारे नॅनोबॉडीजची निर्मीती करण्यात आली. प्रयोगशाळेत या नॅनोबॉडीज जेनेटीकली विकसित करण्यात आल्या आहेत. संशोधकांच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा एंटीबॉडी स्प्रे तयार करण्यासाठी नॅनोबॉडीजचा वापर महत्वपूर्ण ठरला होता.

nasal-spray-2

लामा आणि ऊंट अशा प्राण्यांमध्ये सगळ्यात आधी एंटीबॉडीज विकसित करण्यात आल्या. यात असं दिसून आलं की शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याासाठी या एंटीबॉडी परिणामकारक ठरत आहेत.  संशोधकांकडून आता या नेजल स्प्रेचं मोठ्या स्तरावर मानवी परिक्षण केलं जाणार आहे.  मानवी परिक्षणात १०० टक्के  यशस्वी ठरल्यास कोरोना व्हायरसमुळे पसरत असलेल्या माहामारीला रोखण्यासाठी नेजल स्प्रे सोपा आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. 

दरम्यान भारतातील फार्मा कंपनी झायडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलियाड सायन्सेस अँटीवायरल औषध रेमडेसिव्हीरचे (Remdesivir) सर्वात स्वस्त जेनेरिक औषध लाँच केले आहे. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार 100mg औषधाची किंमत 2 हजार 800 रुपये आहे. जगभरातील अनेक देशातील रुग्णालयात चाचणी दरम्यान रेमडेसिव्हिर हे औषध परिणामकारक ठरलं आहे.  रेमडेसिव्हीरमुळे कोरोनाच्या लक्षणांचा कालावधी कमी होऊ शकतो. उपचारांदरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आल्यानं मागणी वाढली आहे. कोरोनासाठी कोणतेही इतर उपचार नसल्यामुळे या औषधाची मागणी भारतातील अनेक राज्यांमध्ये वाढली आहे.

अमेरिकेतील गिलियाड सायन्सेसने इबोलाच्या उपचारासाठी रेमडेसिव्हीर औषध तयार केले होते. आता भारतातील सिप्ला, जुबिलंट लाइफ, हेटरो ड्रग्स, मायलोन या कंपन्यांना रेमडेसिव्हीरचे  जेनेरिक औषध  भारतात तयार करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान Zydus Cadila ने आपली कोव्हि़ड-19 लस ZyCoV-D ची मानवी चाचणी सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागांतील हजारो लोकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.  या लसीच्या मानवी परिक्षणाला सुरूवात झाली असून रोगप्रतिकारकशक्ती आणि इम्युनोजेनिसिटी किती प्रमाणात वाढते या आधारावर मुल्यांकन केलं जाणार आहे.

हे पण वाचा-

यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता, अनेक कंपन्यांचा पुढाकार

Web Title: Anti corona nasal spray made by antibodies in american university of california

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.