'ही' औषधं हार्ट पेशंट्ससाठी ठरतात घातक, ३ पटीने वाढतो मृत्यूचा धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:52 PM2022-01-14T12:52:07+5:302022-01-14T12:52:32+5:30
Heart patients : WHO नुसार, जगभरात सध्या २८ कोटी लोक डिप्रेशनचे शिकार आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांना डिप्रेशनची समस्या जास्त होते. यासोबतच वयस्कांपेक्षा वयोवृद्धांमध्ये डिप्रेशन जास्त बघायला मिळतं.
Heart patients : आजकालच्या लाइफस्टाईलमुळे डिप्रेशन हा एका सामान्य आजार झाला आहे जो जास्तीत जास्त लोकांमध्ये दिसत आहे. WHO नुसार, जगभरात ५ टक्के लोक कोणत्या ना कोणत्या रूपात डिप्रेशनचे शिकार आहेत. एका नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, डिप्रेशनची आणि मानसिक आजारांची काही औषधे हृदयरोगींसाठी घातक ठरू शकतात. या औषधांमुळे हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये लवकर मृत्यूचा धोका ३ पटीने वाढतो. जेव्हा व्यक्ती जास्त काळ डिप्रेशनमध्ये राहतो तेव्हा त्यांना त्यावरील औषधे खावी लागतात. या रिसर्चचा निष्कर्ष यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
WHO नुसार, जगभरात सध्या २८ कोटी लोक डिप्रेशनचे शिकार आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांना डिप्रेशनची समस्या जास्त होते. यासोबतच वयस्कांपेक्षा वयोवृद्धांमध्ये डिप्रेशन जास्त बघायला मिळतं.
काय सांगतात एक्सपर्ट?
रिसर्चचे लेखक कोपेनहेगन यूनिव्हर्सिटी डेन्मार्कच्या डॉ.पर्निल फेजेवल क्रॉमहॉट यांनी सांगितलं की, आमच्या रिसर्चमधून समर आलं आहे की, हार्टच्या रूग्णांमध्ये मानसिक आजारांची औषधं म्हणजे सायकोट्रॉपिक ड्रग्सचा वापर फारच सामान्य बाब आहे. जवळपास प्रत्येक तिसऱ्या हार्ट पेशंटमध्ये अस्वस्थतेची लक्षणं असतात. त्यामुळे हार्टच्या रूग्णांची टेस्ट योग्य पद्धतीने व्हायला हवी आणि त्यांना हे विचारायला हवं की, ते सायकोट्रॉपिक औषधांचा वापर करतात का? जर करतात तर कोणत्या कारणाने करतात?
त्यांनी सांगितलं की, हे लक्षात ठेवलं पाहिजे की, जेव्हा हार्ट पेशंटना सायकोट्रॉपिक औषधं घेण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा त्यांचा मृत्यूचा धोकाही वाढतो. पण याबाबत आणखी रिसर्च करण्याची गरज आहे की, मृत्यूच्या जास्त दराचं कारण सायकोट्रॉपिक औषधं आहे किंवा मानसिक आजार. आधीच्या रिसर्चमध्ये आढळलं की, हार्ट पेशंट्समध्ये अस्वस्थतेची खराब लक्षणांमुळे मृत्यूचाही धोका असतो.
कसा केला गेला रिसर्च?
या रिसर्चमध्ये १२, ९१३ हार्ट पेशंट्सना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या रूग्णांना हॉस्पिटलमधून सुट्टी देताना त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेण्यात आली आणि त्यांना हॉस्पिटल एनेक्सिटी अॅन्ड डिप्रेशन स्केलवर अस्वस्थतेच्या लक्षणांसंदर्भात आठ किंवा त्यापेक्षा अधिक स्कोरनुसार वर्गीकृत करण्यात आलं. हे रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या सहा महिन्याआधी डिप्रेशनरोधी औषध किंवा मानसिक रोगासंबंधी औषध घेण्यासंबंधी नॅशनल रजिस्टरमधून माहिती एकत्र करण्यात आली. त्यानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यावर एक वर्षांपर्यंत त्यांच्या मृत्यूंचा फॉलोअप घेण्यात आला.