'अॅन्टी ओबेसिटी' डे २०१९, जाणून घ्या लठ्ठपणाची कारणं आणि परीणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 05:07 PM2019-11-26T17:07:51+5:302019-11-26T17:40:10+5:30
आज २६ नोव्हेंबर 'अॅन्टी ओबेसिटी' (Anti obesity) दिवस साजरा केला जातो. सर्व साधारणपणे भारतात लठ्ठपणाचे रुग्ण जास्त आहेत.
(Image credit- Her zindgee)
आज २६ नोव्हेंबर 'अॅन्टी ओबेसिटी' (Anti obesity) दिवस साजरा केला जातो. सर्व साधारणपणे भारतात लठ्ठपणाचे रुग्ण जास्त आहेत. हा दिवस साजरा करण्यामागचं कारण असं की, भारतात झपाट्याने वाढणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण कमी होण्यासाठी जागृती निर्माण करणे. आणि धोकादायक आजारांपासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करणे. स्थूलता म्हणजेच शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे होय. स्थूलता हा कायमस्वरुपी आजार म्हणजेच मोठ्या कालावधीसाठी शरीरात राहाणारा आजार मानला जातो. हा आजार लहान मुलांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊया लठ्ठपणाची कारणं आणि परिणाम.
(Image credit- deccanchronicle)
लठ्ठपणाची कारणं
१) बदलती जीवनशैली - बदलती जीवनशैली हेच स्थूलतेचे प्रमुख कारण आहे. जास्त खाणे आणि कमी श्रम हा चुकीचा मार्ग आहे. याउलट जास्त काम आणि कमी खाणे हे कुपोषणाचे कारण असते.
२) जंक फुडचे अधिक सेवन- ब्रेड, बिस्कीट यासारख्या मैद्याचे पदार्थ अति सेवन केल्यास शरीर वाढत जाते. तसेच बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ शरीरास अपायकारक ठरतात.
३) व्यायाम न करणे - बरेच लोक दैनंदिन जीवन जगत असताना शरीराची फारशी हालचाल करत नाहीत. त्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येतो. तसेच विविध आजारांचा सामना करावा लागतो.
४) अनुवंशिकता - बरेचवेळा पालक लठ्ठ असले की मुलांमध्येही लठ्ठपणा येतो. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा चरबीचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांमधील हार्मोन्स् व स्थूलता यांचा जवळचा संबंध आहे. असे हार्मोन्स् स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढवितात. म्हणून ती नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. शारिरीक व मानसिक स्थैर्यातून ते सहज शक्य आहे. स्त्रियां अन्न उरलेले असेल तर ते वाया जाऊ नये म्हणून संपविणे हा प्रकारदेखील होतो. यामुळे जास्त खाल्ले जाते. कौटुंबिक जबाबदारी व वेळेचा अभाव यामुळे व्यायाम किंवा खेळ या गोष्टींकडे विशेष दुर्लक्ष केले जातं. साहजिकच शारीरिक असंतुलन निर्माण व्हायला लागतं.
(Image credit-vydehi school of excellence)
लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपा़य
१) आहारातील भाजीपाला,दूध, फळं, यांचे योग्य प्रमाणात सेवन करा.
२) आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी वेगवेगळे पदार्थ असावेत.
३) पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवून उठावे.
४) पिष्टमय पदार्थ आणि तेल-तूप आणि साखर यांचे प्रमाण कमी करावे.
(Image credit-Daily mail)
५) दररोज व्यायाम करावा. त्यामुळे शरीर लवचीक रा़हते.
६)दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.