अँटीबॅक्टेरियल साबणामुळे हात धुवाल तर पडेल महागात! फायद्यांपेक्षाही जास्त आहेत तोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 03:41 PM2021-08-27T15:41:53+5:302021-08-27T15:45:13+5:30
अनेक प्रकारचे साबण अॅन्टीबॅक्टेरियल असल्याचा दावा करतात. सुरक्षेचा विचार करुन लोक त्याची खरेदीही करतात. बॅक्टेरियाचा त्रास होऊ नये यासाठी लोक ते वापरतात. पण, या अॅन्टीबॅक्टेरियल साबणाने नुकसानच जास्त होतं.
कोरोनामुळे (Corona) सगळ्यांनाच स्वच्छतेचं महत्व समजलेलं आहे. त्यामुळे इतर साबणांपेक्षा आता अॅन्टीबॅक्टेरियल साबणाचा वापर सुरू झाला आहे. आता तर लादी पुसण्यासाठीही अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टीव्हायरल लिक्विड वापरण्यास सुरुवात झालेली आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे साबण अॅन्टीबॅक्टेरियल असल्याचा दावा करतात. सुरक्षेचा विचार करुन लोक त्याची खरेदीही करतात. बॅक्टेरियाचा त्रास होऊ नये यासाठी लोक ते वापरतात. पण, या अॅन्टीबॅक्टेरियल साबणाने फायद्याऐवजी नुकसानच जास्त होतं.
हे साबण वापरावेत
अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (U.S. Food and Drug Administration-FDA)अशी उत्पादनं खरेदी न करण्याचा सल्ला दिलेला आहे. तर, अॅन्टीबॅक्टेरियल सोपमुळे बॅक्टेरिया मरतात असा दावा विज्ञान करत नसल्याचं सांगितलं आहे. साधा साबण वापला तर, बॅक्टेरिया मरत नाहीत आणि अॅन्टीबॅक्टेरियल साबणानेच मरतात हे सिद्ध होऊ शकत नाही. पण, अॅन्टीबॅक्टेरियल साबणाने थोडाफार फायदा होऊ शकतो. FDAच्या मते अॅन्टीबॅक्टेरियल साबणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने त्यावर नेहमीच शंका व्यक्त केली जाते.
२०१३ मध्ये FDAने अॅन्टीबॅक्टेरियल साबणाचं उत्पादन करणाऱ्या कंपनीला त्याच्या फायद्यांचा दावा करणारं प्रमाणपत्र देण्यास सांगितलं होतं. पण, कोणत्याही कंपनीने तसं केलं नाही. यानंतर FDAने अॅन्टीबॅक्टेरियल साबणाऐवजी साधा साबण वापरण्याचा सल्ला दिला.
हानिकारक रसायनांचा वापर
बऱ्याच संशोधनानंतर FDAने अॅन्टीसेप्टीक वॉश प्रोडक्ट (antiseptic wash products) म्हणजे लिक्वीड, फोम, जेल हॅन्ड सोप, साबणाची वडी आणि बॉडी वॉशमध्ये ट्रायक्लोसन (triclosan) आणि ट्रिक्लोकार्बन (triclocarban) नावाचे घातक केमिकल असतात.