अॅंटीबायोटिकचं अत्याधिक सेवन शरीराला 'असं' पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 10:06 AM2018-10-31T10:06:30+5:302018-10-31T10:06:53+5:30
अॅंटीबायोटिक(Antibiotics) औषधांचा वापर आता एक सामान्य बाब झाली आहे. अॅंटीबायोटिक औषधांचा वापर आपल्याला बॅक्टेरियाव्दारे झालेल्या संसर्गावर उपचार म्हणून केला जातो.
अॅंटीबायोटिक(Antibiotics) औषधांचा वापर आता एक सामान्य बाब झाली आहे. अॅंटीबायोटिक औषधांचा वापर आपल्याला बॅक्टेरियाव्दारे झालेल्या संसर्गावर उपचार म्हणून केला जातो. सर्दी, खोकला, ताप, टीबी, न्यूमोनिया आणि स्किन इन्फेक्शन यांसाठी हे औषध प्रामुख्याने दिलं जातं. जेणेकरुन आपल्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट व्हावे. मात्र तज्ज्ञांनुसार, या औषधांचा अत्याधिक वापर करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो.
एका शोधात आढळलं आहे की, शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ही संसर्गजन्य रोगांसोबत लढण्यासाठी, जळजळ तसेच सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. मात्र अॅंटीबायोटीकमुळे शरीरातील या नैसर्गिक क्षमतांचा प्रभाव कमी होऊ शकतो. अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शरीरात राहणारे विषाणू, त्यांचं फॅटी अॅसिड आणि आणखीही काही तत्वांचा जे तोंडाच्या संक्रमणापासून लढण्याची क्षमता ठेवतात यांचं विश्लेषण केलं.
केस वेस्टर्नमधील सहायक प्राध्यापक पुष्पा पंडियान म्हणाले की, 'या प्रयोगातून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, जर एखाद्या फंगल इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी आपल्याजवळ एखादा विषाणू नसेल तर काय होईल'.
त्यांनी सांगितले की, जीवघेण्या संक्रमणांना नष्ट करण्यासाठी आजही अॅंटीबायोटिकची गरज पडते. पंडियान म्हणाले की, 'आपल्या शरीरात काही नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आहेत आणि त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये. तसेच अॅंटीबायोटिकच्या विनाकारण अत्याधिक वापरामुळे कोणताही फायदा होत नाही'.
अॅंटीबायोटिक घेताना ही काळजी घ्यावी
अॅंटीबायोटिक औषधे कॅल्शिअम आणि आयर्नसारख्या व्हिटॅमिन व मिनरल्स घेताना प्रभावी ठरत नाहीत. तसेच अॅंटीबायोटिकचं सेवन केल्यावर काही महिने तुमच्या पचनक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे काही दिवस पचनाला सोप्या आणि हलक्या पदार्थांचं सेवन करायला हवं.
अॅंटीबायोटिकला काही घरगुती पर्याय
अॅंटीबायोटिक औषधे जितक्या लवकर तुमची समस्या दूर करतात तितका त्याचा शरीरावर वाईट प्रभाव होतो. त्यामुळे अॅंटीबायोटिकला पर्याय म्हणून तुम्ही काही हर्बल औषधांचाही वापर करु शकता. महत्त्वाची बाब म्हणजे याचे आपल्या शरीरावर दुष्परिणामही होत नाहीत.
लसणाचे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वेगवेगळ्या समस्यांमध्ये याचा औषध म्हणूनही वापर केला जातो. जर्मनीच्या हेल्थ अॅडवाईस असोसिएशननुसार, दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश करायला हवा. कारण लसणामध्ये अॅंटीबायोटिक गुण असतात. याचा आपल्या शरीरातील विषाणू नष्ट करण्यासाठी फायदा होतो. याच कारणाने जखम धुण्यासाठीही लसणाच्या रसात थोडं पाणी मिश्रित करुन वापरलं जातं. लसणामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि सल्फाइड भरपूर प्रमाणात असतात.