आजपासून 800 हून अधिक औषधे महाग, 12 टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या कोणत्या औषधांचा समावेश?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:00 PM2024-04-01T12:00:46+5:302024-04-01T12:01:17+5:30
Medicine price hike in india 2024 : या औषधांच्या किमतीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : आजपासून देशात 800 हून अधिक औषधे महाग झाली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्या अंतर्गत आता अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत. या औषधांच्या किमतीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अंतर्गत राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये (NLEM) 0.0055 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, या यादीमध्ये अशी काही औषधे आहेत, जी सामान्य दैनंदिन समस्यांमध्ये उपयुक्त आहेत. अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. त्यासंदर्भात जाणून घ्या...
पॅरासिटामॉलच्या किमतीत 130 टक्के वाढ
रिपोर्ट्सनुसार, पॅरासिटामॉलच्या किमती 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, हे असे एक औषध आहे, ज्याचा उपयोग तापासह अनेक आजारांच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. त्याच्या किमतीत झालेली वाढ ही सर्वसामान्यांसाठी थोडी जास्त असू शकते.
पेनकिलर आणि अँटिबायोटिक्सही महाग
पेनकिलर, अँटिबायोटिक्स आणि अँटि-इंफेश्कन औषधेही महाग झाली आहेत. पेनिसिलिन जी 175 टक्के महाग झाली आहे, तर एज़िथ्रोमायसिन आणि इतर काही औषधे देखील महाग झाली आहेत. याशिवाय अनेक स्टिरॉइड्सचाही या यादीत समावेश आहे.
ही औषधेही झाली महाग
एक्सपिएंट्सच्या किमतीही वाढल्या आहेत. या औषधांच्या किंमती 18-262 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामध्ये ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकोल, सिरपसह सॉल्व्हेंट्स समाविष्ट आहेत. हे 263 ते 83 टक्के महाग झाले आहे. याशिवाय काही इंटरमीडिएट्स औषधांच्या किमतीही 11 ते 175 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.