'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:00 AM2019-08-28T10:00:42+5:302019-08-28T10:04:56+5:30

तुम्हीही 'या' औषधांचं अधिक सेवन करत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे.

Antibiotics Use and Increased Risk of Colon Cancer? | 'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका?

'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका?

Next

(Image Credit : independentpharmacy.co.za)

सर्दी-खोकला किंवा छोट्या-मोठ्या आजारासाठी जर तुम्ही अ‍ॅलोपॅथी डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर सर्वातआधी ३ ते ६ दिवसांचा अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा कोर्स लिहून देतात. अनेकदा तर अलिकडे डॉक्टरला न विचारताही आजारी पडल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक औषधंं घेतात. तुम्हीही असं करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण या औषधांमुळे कोलोन किंवा रेक्टल कॅन्सर म्हणजेच कर्करोग (आतड्यांचा कॅन्सर) होण्याचा धोका वाढतो, असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. 

अ‍ॅंटी-बायोटिकचा वापर वाढलाय

medscape.com या हेल्थ वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, एका नव्या रिसर्चमधून हे समोर आले आहे की, सिंगल कोर्स अ‍ॅंटी-बायोटिकच्या सेवनामुळे कोलोन म्हणजेच मलाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. Gut नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला असून अ‍ॅंटी-बायोटिकचा वापर कशाप्रकारे समजूतदारपणे करण्याची गरज आहे, यावर यात अधिक जोर देण्यात आला आहे. कारण डॉक्टर्स अधिक प्रमाणात अ‍ॅंटी-बायोटिक देतात आणि याचा वापरही अधिक होतो. 

क्रॉनिक आजारांचा धोका

या रिसर्चच्या मुख्य लेखिका सिंथिया सिअर्स सांगतात की, आमच्या रिसर्चमधून यावर जास्त जोर देण्यात आला आहे की, याप्रकारची औषधे शरीरावर किती वाईट प्रभाव करतात आणि याने अनेक प्रकारचे क्रॉनिक आजारही(दीर्घकालीन) होऊ शकतात. या रिसर्चमध्ये यूकेतील १ कोटी १० लाख रूग्णांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात जानेवारी १९८९ ते डिसेंबर २०१२ म्हणजे २३ वर्षांच्या कालावधीचं विश्लेषण झालं. यात साधारण २८ हजार ८९० रूग्णांना कोलोरेक्टल कॅन्सर असल्याचं समोर आलं.

अ‍ॅंटी-बायोटिकमुळे मलाशयाच्या कॅन्सरचा धोका

रिसर्चमध्ये मेडिकल रेकॉर्ड्सचा वापर प्रत्येक केसचा इतिहास जाणून घेण्यासाठी करण्यात आला. ज्यात कोलोन कॅन्सरचे रिस्क फॅक्टर्स जसे की, लठ्ठपणाचा इतिहास, धुम्रपान, अल्कोहोलचं सेवन, डायबिटीस आणि अ‍ॅंटी-बायोटिकच्या वापरावरही लक्ष देण्यात आलं. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांना कोलोन कॅन्सर झाला, ते अ‍ॅंटी-बायोटिकचा अधिक वापर करत होते.

Web Title: Antibiotics Use and Increased Risk of Colon Cancer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.