Covishield: डेल्टा व्हेरिअंट 'बकासूर'! कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस द्यावा लागेल; ICMR चा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 12:28 PM2021-07-07T12:28:25+5:302021-07-07T12:29:27+5:30

Covishield third dose: कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिअंट (Corona Delta variant) तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीपासून निर्माण झालेल्या अँटिबॉडी (Antibody) हा डेल्टा स्ट्रेन वेगाने संपवत असल्याचे समोर आले आहे.

Antibody drop against Delta corona variant who got covishield first or two dose; need to get third dose: ICMR  | Covishield: डेल्टा व्हेरिअंट 'बकासूर'! कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस द्यावा लागेल; ICMR चा सल्ला

Covishield: डेल्टा व्हेरिअंट 'बकासूर'! कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस द्यावा लागेल; ICMR चा सल्ला

Next

पुणे/ नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिअंट (Corona Delta variant) तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीपासून निर्माण झालेल्या अँटिबॉडी (Antibody) हा डेल्टा स्ट्रेन वेगाने संपवत असल्याचे समोर आले आहे. आयसीएमआर (ICMR) ने केलेल्या अभ्यासात कोव्हिशिल्ड (Covishield) घेतलेले लोक डेल्टा कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होत आहेत. यामुळे त्यांच्या शरीरात तयार झालेली अँटिबॉडी कमजोर पडू लागली आहे. यामुळे या लोकांना तिसरा डोस दिला जावा असा सल्ला संशोधक देत आहेत. (ICMR says Antibody drop against Delta in vaccinated may suggest need for third dose who got covishield.)

 बापरे! चार आठवड्यांत ३० देशांत पसरला; डेल्टा पेक्षाही खतरनाक Lambda Variant ची दस्तक

D614G म्यूटेशनच्या जुन्या व्हायरसच्या तुलनेत डेल्टा व्हेरिअंट कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसपासून बनलेली अँटीबॉडी 4.5 पटींनी आणि दुसऱ्या डोसपासून बनलेली अँटीबॉडी 3.2 पटींनी कमी करतो. आयसीएमआरचे महामारी आणि संक्रमण विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, या प्रकाराच्या माहितीमुळे लसीकरण अभियानाची रणनीती ठरविण्यास मदत मिळणार आहे. यामुळे तिसरा डोस द्यायचा की नाही, कोणाला द्यायचा याची गरजही लक्षात येणार आहे.

आयसीएमआरने केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांना कोरोना झाला त्यांच्यात कोरोना व्हायरसने लसीच्या पहिल्या डोससारखे काम केले. कोरोना झालेल्या ज्या लोकांनी दोन डोस घेतले त्यांच्याच तीन वेळा अँटिबॉडी तयार झाल्या. अशाचप्रकारे जे कोरोना संक्रमित झाले नव्हते त्यांनी कोव्हिशिल्डचे एक किंवा दोन डोस घेतले व संक्रमित झाले, त्यांच्यातही अंटिबॉडी मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आढळल्याचे डॉ. पांडा  यांनी सांगितले. 

Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा

मात्र, ज्या लोकांनी कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतलेत आणि ते घेण्यापूर्वी किंवा नंतर कोरोना संक्रमित झालेले नाहीत त्यांना तिसरा डोस घेण्याची गरज भासणार आहे. तरच त्यांच्यात तीनवेळा अँटिबॉडी तयार झालेल्या लोकांएवढी अँटिबॉडी तयार होईल, असेही पांडा यांनी म्हटले आहे. 
डॉ. यादव यांनी सांगितले की, ज्यांना नुकताच कोरोना होऊन गेला आहे, त्यांना लसीचा एकच डोस पुरेसा आहे. परंतू जे कधीच संक्रमित झालेले नाहीत, त्या लोकांमध्ये कोव्हिशिल्डमुळे अँटिबॉडी विकसित झाली आहे. यातही काही मोजक्याच लोकांमध्ये लस घेतल्यानंतर अँटिबॉडी तयार झालेली नाही. 
 

Read in English

Web Title: Antibody drop against Delta corona variant who got covishield first or two dose; need to get third dose: ICMR 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.