ज्येष्ठमधाचं सेवन करण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, जाणून घ्या कसं करावं सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:10 PM2024-09-16T12:10:05+5:302024-09-16T12:10:43+5:30
ज्येष्ठमध अनेक आजारांवर रामबाण उपाय असतं. यातील तत्वांमुळे सर्दी-खोकला, घसा बसणे अशा समस्या लगेच दूर होतात.
Mulethi Benefits: ज्येष्ठमधाला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण याद्वारे अनेक आजारांवर उपचार केले जातात. ज्येष्ठमधाचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापर केला जातो. यात अॅंटी-वायरल, अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात. अशात आज आम्ही तुम्हाला ज्येष्ठमधाचे फायदे आणि याचं सेवन कसं करावं याबाबत माहिती देणार आहोत.
ज्येष्ठमधाने दूर होणारे आजार
ज्येष्ठमध अनेक आजारांवर रामबाण उपाय असतं. यातील तत्वांमुळे सर्दी-खोकला, घसा बसणे अशा समस्या लगेच दूर होतात. यात इन्फेक्शन रोखण्याची क्षमता सुद्धा असते. तसेच याच्या सेवनाने पचन तंत्रही चांगलं राहतं. ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्याही दूर होतात.
कसं करावं याचं सेवन?
ज्येष्ठमधाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. मात्र, जास्तीत जास्त लोक याच्या काढ्याचं सेवन अधिक करतात. यासाठी ज्येष्ठमधाची काठी पाण्यात उकडून घ्या आणि नंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याचं सेवन करा. तसेच तुम्ही ज्येष्ठमधाचं पावडर आणि मध कोमट पाण्यात टाकूनही सेवन करू शकता.
ज्येष्ठमध सेवन करण्याची आणखी एक पद्धत आहे. तुम्ही ज्येष्ठमध थेटही खाऊ शकता. याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून तुमचा बचाव होतो. तसेच ज्येष्ठमधाच्या सेवनाने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि सोबतच शरीरातील वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं.