लसीकरणानंतर चिंताग्रस्त प्रकरणे दहा पटीने वाढली, महिलांवर अधिक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:46 AM2021-09-23T10:46:00+5:302021-09-23T10:46:43+5:30
Anxiety Cases Increased Tenfold After Vaccine : 12 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या रिपोर्टमध्ये चिंताग्रस्ततेची दोन प्रकरणे नोंदवली गेली. दुसऱ्या रिपोर्टमघ्ये ही संख्या 20 नोंदवली आहे. ज्यात 15 महिला आहेत.
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणानंतर काही लोकांमध्ये चिंता दिसून येत आहे, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. लसीच्या प्रतिकूल परिणामांवर सरकारने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, लस घेतल्यानंतर चिंताग्रस्त रुग्णांची संख्या 10 पट वाढली आहे, ज्यामध्ये बहुतेक महिला आहेत. (Study: Anxiety Cases Increased Tenfold After Vaccine, More Impact On Women)
12 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या रिपोर्टमध्ये चिंताग्रस्ततेची दोन प्रकरणे नोंदवली गेली. दुसऱ्या रिपोर्टमघ्ये ही संख्या 20 नोंदवली आहे. ज्यात 15 महिला आहेत. तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतरही लसीबद्दलचा गैरसमज किंवा भीती एखाद्या व्यक्तीमध्ये लवकर जात नाही. अशा लोकांना असे वाटते की, ज्या काही समस्या त्यांना भेडसावत आहे,त्या लसीशी संबंधित आहे. लसीच्या प्रतिकूल परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या ताज्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत लसीकरणामुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.
रिपोर्ट काय सांगतो?
लसीकरणानंतर ज्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा 78 प्रकरणांचा आढावा घेतला असता असे दिसून आले की, 48 प्रकरणे लसीकरणाशी संबंधित होती. लसीच्या उत्पादनाशी संबंधित प्रतिक्रिया या 48 रुग्णांपैकी 28 रुग्णांची तब्येत बिघडण्यामागील कारण असल्याचे आढळून आले. तर 20 रुग्ण असे आहेत, ज्यांना लस घेतल्यानंतर चिंता वाटली आणि नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 22 रुग्णांमध्ये लसीकरण थेट जबाबदार असल्याचे आढळले नाही.
कोल्ड ड्रिंकच्या एका बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंटच्या नादात फसला अन्... https://t.co/D0V8p7omZ2
— Lokmat (@MiLOKMAT) September 23, 2021
'गैरसमज नाही, विश्वास गरजेचा'
नवी दिल्लीतील इहबास हॉस्पिटलचे डॉ. ओमप्रकाश यांनी सांगितले की, स्त्रियांमध्ये त्यांच्या प्रश्नांची पुरेशी माहिती मिळत नसल्याने परिस्थिती अधिक क्लिष्ट आहे. लसीबद्दल लोकांचा गैरसमज नाही, विश्वास ठेवला तर नंतर चिंता वाटण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. जर तुमच्या (विशेषत: महिलांच्या) मनात काही भीती असेल आणि तुम्ही काही दबावामुळे लस घेतलीच तर चिंता वाढण्याचा धोका असतो.
मृतांची संख्या 100 हून अधिक
गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या दैनंदिन मृत्यूंमध्ये 100 पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी देशात 252 रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी हॉस्पिटलमध्ये 383 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्याचबरोबर, गेल्या एका दिवसात 26,964 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 34167 रुग्ण कोरोनामुक्त झाले.