अॅपल सायडर व्हिनेगर आहे घशाच्या खवखवीवर रामबाण, करा 'असा' उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:46 PM2021-06-30T13:46:56+5:302021-06-30T13:47:34+5:30
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बरेच रोग दूर राहतात. अॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद आणि यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून बनवले जाते. घशाच्या खवखवीवर अॅपल सायडर व्हिनेगर रामबाण आहे कसे ते पाहुया?
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बरेच रोग दूर राहतात. अॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद आणि यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून बनवले जातात. हे केवळ एक पेयच नाही तर, त्यात अनेक खनिजे, जीवनसत्त्वे आणि बरेच अॅसिड असतात. घशाच्या खवखवीवर अॅपल सायडर व्हिनेगर रामबाण आहे कसे ते पाहुया?
एक ग्लास गरम पाणी प्या आणि त्यामध्ये एक मोठा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोन चमचे मध घाला मिसळा आणि प्या. तुम्ही हे दिवसातून एकदा पिऊ शकता.
एका ग्लासात एक मोठा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर टाकुन प्या. दिवसातून तुम्ही हे एकदा पिऊ शकता.
घशाची खवखव दुर करण्यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करून एक प्रभावी मिश्रण तयार करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक मोठा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, एक मोठा चमचा मध, एक मोठा चमचा दालचिनी, एक मोठा चमचा लिंबू एकत्र करून चहासारखे पिऊ शकता किंवा गरम करून त्याच्या गुळण्या करू शकता.
घशाच्या खवखवीवर मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या जातात. तुम्ही एक मोठा चमचा अॅपल सायडर मीठाच्या पाण्यात घालुन गुळण्या करू शकता.