हेल्दी समजून डायजेस्टिव्ह बिस्किट खात असाल; तर तुम्हालाही होऊ शकतो 'असा' त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:18 PM2021-01-13T12:18:00+5:302021-01-13T12:26:50+5:30

Health Tips in Marathi : चव वाढवण्यासाठी अनेक केमिक्लसचासुद्धा वापर केला जातो. अनेकदा यात समाविष्ट असलेले पदार्थ आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पाडतात.

Are digestive biscuits healthy or unhealthy | हेल्दी समजून डायजेस्टिव्ह बिस्किट खात असाल; तर तुम्हालाही होऊ शकतो 'असा' त्रास

हेल्दी समजून डायजेस्टिव्ह बिस्किट खात असाल; तर तुम्हालाही होऊ शकतो 'असा' त्रास

Next

डायजेस्टिव्ह बिस्किट्सच्या वेगवेगळ्या जाहिराती तुम्ही नेहमीच बघत असता.  जास्तवेळ भूक लागू नये यासाठी  डायजेस्टिव्ह बिस्किट्स उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जाते. नवभारत टाईम्सच्या रिपोर्ट्नुसार शुगर, फॅट आणि सोडियम फ्री असण्याचा दावा करत असलेल्या या बिस्किट्समध्ये जास्तीत जास्त साखर, फॅट्स, सोडियम आणि रिफाईंड पीठाचा समावेश असतो. चव वाढवण्यासाठी अनेक केमिक्लसचासुद्धा वापर केला जातो. अनेकदा यात समाविष्ट असलेले पदार्थ आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पाडतात.

डायजेस्टिव्ह बिस्किट खाणं शरीरासाठी कितपत फायदेशीर ठरतं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डायजेस्टिव्ह बिस्किट डॉक्टरांच्या सल्ल्यानं  गॅस आणि पचनशक्ती चांगली नसलेल्या लोकांसाठी तयार करण्यात आले होते.  कारण डायजेस्टिव्ह बिस्किट्स  बाजारात उपलब्ध होत असलेल्या इतर बिस्किट्सच्या तुलनेत जास्त फायबर, प्रोटीन आणि व्हिटामीन्सयुक्त असतात. चहासोबत ही बिस्कीटं खाण्याचा सल्ला दिला जातो. डायबिटीसच्या रुग्णांसाठीही  फायदेशीर ठरणारी ही बिस्किटं आहेत. 

ग्लूटेनचं अति प्रमाणात सेवन करणं ठरू शकतं घातक

बेकरीचे पदार्थ मैद्यापासून तयार केलेले असतात. डायजेस्टिव्ह बिस्किट्समध्ये मैद्याऐवजी गव्हाचा वापर केला जातो असा दावा केला जातो. गव्हाच्या पीठात ग्लूटेन असते. वेगवेगळ्या ब्रँण्ड्सच्या डाइजेस्टिव्ह बिस्किट्समध्ये ग्लुटेनचं प्रमाण वेगवेगळं असतं. जर तुम्ही ग्लूटेन सेंसिटिव्ह असाल तर डायजेस्टिव्ह बिस्किट्स तुमच्यासाठी फायेदशीर ठरणार नाही. ग्लूटेनचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं  गॅस, पोटदुखी, डायरियाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.  

अनेक डायजेस्टिव्ह बिस्किट्सच्या पाकिटांवर फॅट फ्री असल्याचा दावा केला जातो. पण त्यात सॅचूरेटेड फॅट्स असतात. फॅट्सच्या इतर पर्यायांचा वापर केला जातो. अति प्रमाणत सॅचुरेटेड फॅट्सचं सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉल आणि गॅस्टोइंटस्टाईनल आजारांचा धोका वाढू शकतो. 

बाजारात मागणी वाढल्यानंतर या बिस्किटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिजरवेटिव्स मिसळले जातात.  ज्यामुळे दीर्घकाळपर्यंत चांगले राहण्यास मदत होऊ शकते. सुगंधासाठी यात एसेंस टाकले जाते. अशी बिस्टिकट खाणं तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे की नाही हे त्यात मिसळले जात असलेल्या पदार्थांच्या क्वालिटीवर अवलंबून असते. 

डायजेस्टिव्ह बिस्किट्स इतर बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. यात नॅचरल स्वीटनर्ससोबत साखरेचा वापरही केला जातो. ही बिस्किट्स शुगर लेस असतात असं अजिबात नाही. अशा पदार्थामुळे तुमच्या शरीरात जास्त साखर गेल्यास लठ्ठपणा, हृदयाचे आजार, डायबिटीस सारखे आजार वाढू शकतात. सावधान! रोजच्या 'या' दोन गोष्टींमुळे वाढू शकतो ब्रेन कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून करण्यात आला खुलासा....

डायजेस्टिव्ह बिस्किट्सची चव वाढवण्यासाठी त्यात सोडियमचाही वापर केला जातो. सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन करणं  हाय ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकच्या समस्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.  प्रत्येकाला वेगवेगळ्या शारिरीक समस्या  असू शकतात म्हणून कोणत्याही उत्पादनावर डोळे बंद करून विश्वास ठेवण्याआधी नीट पारखून घ्या. डायडजेस्टिव्ह बिस्किट्सपेक्षा कडधान्य, ड्रायफ्रुट्सचा आपल्या आहारात समावेश करा. कोरोना रुग्णाजवळ श्वास रोखून धरणं, कमी वेगानं श्वास घेणं ठरतंय जीवघेणं; वाढेल संक्रमणाचा धोका

(टिप : या लेखातील टिप्स आणि सल्ले हे केवळ माहितीसाठी आहेत. याकडे डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनल्सचा सल्ला म्हणून बघू नका. यात दिलेल्या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही. ही केवळ रिसर्चमधून समोर आलेली माहिती आहे. आहार निवण्यासाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Are digestive biscuits healthy or unhealthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.