Coronavirus सोबत लढताना कोणता मास्क जास्त फायदेशीर कपड्याचा की N95? वाचा तज्ज्ञांचा सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:00 AM2021-04-19T10:00:22+5:302021-04-19T10:01:17+5:30

Coronavirus : लोकांना पुन्हा प्रश्न पडू लागला की, अशा स्थितीत कोणता मास्क वापरणं योग्य राहील किंवा कोणत्या मास्कने (Mask) कोरोनापासून बचाव केला जाऊ शकतो.

Are N95 masks better than cloth masks and are they reusable here is the answer | Coronavirus सोबत लढताना कोणता मास्क जास्त फायदेशीर कपड्याचा की N95? वाचा तज्ज्ञांचा सल्ला...

Coronavirus सोबत लढताना कोणता मास्क जास्त फायदेशीर कपड्याचा की N95? वाचा तज्ज्ञांचा सल्ला...

Next

जेव्हापासून मेडिकल जर्नल 'द लॅंसेट'मध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये दावा करण्यात आला की, कोरोना व्हायरस (Coronavirus) हवेतून पसरण्याचीही शक्यता आहे. तेव्हापासून लोकांना पुन्हा प्रश्न पडू लागला की, अशा स्थितीत कोणता मास्क वापरणं योग्य राहील किंवा कोणत्या मास्कने (Mask) कोरोनापासून बचाव केला जाऊ शकतो. मॅरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी N95 किंवा KN95 मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय.

DNA मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डॉ. फहीम यूनुस म्हणाले की, हवेतून पसरणाऱ्या व्हायरसपासून बचावासाठी N95 किंवा KN95 मास्कचा वापर करणं चांगला पर्याय आहे. त्यांनी हे मास्क वापरण्याचा सल्ला देत सांगितले की, एका मास्क एका दिवशी वापरा. त्यानंतर तो मास्क पेपर बॅगमध्ये ठेवा आणि दुसरा वापरा. प्रत्येत २४ तासात अशीच मास्कची अदला-बदली करा. ते असंही म्हणाले की, जर मास्कचं काही नुकसान झालं नाही तर ते अनेक आठवडे वापरले जाऊ शकतात. (हे पण वाचा : CoronaVirus News : समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण)

विना मास्क समुद्र किनारी आणि पार्कमध्ये जाऊ शकतो का? या प्रश्नावर डॉ. फहीम युनूस म्हणाले की, जर दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचं अंतर असेल तर अशा ठिकाणांवर विना मास्क फिरणं सुरक्षित आहे. ते म्हणाले की, जेव्हा विषय हवेतून पसरणाऱ्या व्हायरसचा येतो तेव्हा एन९५ मास्क निश्चितपणे कपड्याच्या मास्कपेक्षा जास्त चांगला ठरतो. N95 आणि सर्जिकल मास्क व्यक्तिगत सुरक्षा उपकरणाचं उदाहरण आहेत. हे मास्क हवेतील बारीक कणांपासून आपली रक्षा करतात. हे हवेतील ९५ टक्के कण रोखण्यास सक्षम आहेत. त्यामुळे यांचं नाव N95 पडलं आहे. 
 

Web Title: Are N95 masks better than cloth masks and are they reusable here is the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.