जास्त जगाल की कमी? शरीरातील या संकेतांना समजून घेऊन लावता येईल अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:02 PM2022-07-13T12:02:10+5:302022-07-13T12:02:24+5:30

Risk of early death : रिसर्चमधून समोर आलं आहे की, 10 सेकंदापेक्षा कमी वेळ एका पायावर बॅलन्स करणं अवघड जात असेल तर हा इशारा आहे की, तुमचा वेळेआधीच मृत्यू होऊ शकतो.

Are you at risk of an early death simple health tests show risk of early death | जास्त जगाल की कमी? शरीरातील या संकेतांना समजून घेऊन लावता येईल अंदाज

जास्त जगाल की कमी? शरीरातील या संकेतांना समजून घेऊन लावता येईल अंदाज

Next

Risk of early death : वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या रिसर्चमधून याचे संकेत सांगितलं आहेत की, ज्यातून समजेल की तुम्हाला वेळेआधीच मृत्यूचा धोका आहे. पण आता याबाबत एक्सपर्ट्सनी आणखी काही गोष्टींबाबत सांगितलं आहे. रिसर्चमधून समोर आलं आहे की, 10 सेकंदापेक्षा कमी वेळ एका पायावर बॅलन्स करणं अवघड जात असेल तर हा इशारा आहे की, तुमचा वेळेआधीच मृत्यू होऊ शकतो. 

'डेली मेल'च्या एका रिपोर्टनुसार, 50 ते 75 वयोगटातील 2 हजार लोकांवर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये आढळून आलं की, जे लोक 10 सेकंद एका पायावर उभे राहू शकत नाही, त्यांची लवकर मृत्यू होण्याची शक्यता त्या लोकांपेक्षा 84 टक्के जास्त असते लोक ही टेस्ट पास झाले.

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार,  जे लोक एका पायवर उभं राहून बॅलन्स ठेवू शकत नाहीत त्यांना लवकर मृत्यूचा जास्त धोका असतो. रिसर्च दरम्यान सर्व सहभागी  लोकांना कशाचाही आधार न घेता 10 सेकंद एका पायावर उभं राहण्यास सांगितलं. अशाप्रकारे एका पायावर उभं राहण्यासाठी त्यांना केवळ तीन  संधी देण्यात आल्या. दोन्ही हात साइडला आणि दुसरा पाय मागच्या बाजूला करण्यास सांगण्यात आलं होतं.

वॉकिंग स्पीड

एका पायावर बॅलन्स न ठेवू शकल्याने लोक वृद्ध लोक हळूहळू चलतात, त्यांना वेळेआधी मृत्यूचा धोका जास्त राहतो.
फ्रन्सच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अॅन्ड मेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी 65 पेक्षा जास्त वय असलेल्या 3200 लोकांच्या चालण्याच्या स्पीडवर 5 वर्ष लक्ष ठेवलं. रिसर्चदरम्यान सर्वांना 6 मीटर लॉन्ग कॉरिडोरवर चालण्यास सांगण्यात आलं होतं. यादरम्यान सर्वांची चालण्याची स्पीड तीन वेगवेगळ्या पॉइंट्सवर मोजण्यात आली.

यातून समोर आलं की, सर्वात हळू चालणारे पुरूष 90 मीटर प्रति मिनिट चालले, तर सर्वात वेगाने चालणारे 110 मीटर प्रति मिनिटाने अधिक वेगाने चालले. यादरम्यान सर्वात हळू महिला वॉकरने 81 मीटर प्रति मिनिटात अंतर पार केलं. तर सर्वात वेगाने चालणाऱ्या महिलेने कमीत कमी 90 मीटर प्रति मिनिटे अंतर पार केलं. विश्लेषणातून समोर आलं की, सर्वात हळू चालणाऱ्या लोकांमध्ये वेळेआधी मृत्यूचा धोका 44 टक्के अधिक असतो. वेगाने चालणाऱ्या लोकांचं हृदय फिट राहतं.

बसणं- उठणं 

विना कोणत्याही आधारे बसणं आणि उठणं याकडे इशारा करतं की, तुमचं आरोग्य कसं आहे आणि तुम्ही किती काळ जगू शकता. अभ्यासकांना आढळून आलं की, ज्या लोकांना खाली बसल्यावर उठण्यासाठी अडचणी येतात, त्यांच्या लवकर मृत्यूची शक्यता 5 पटीने अधिक असते. ब्राझीलमध्ये गामा फिल्हो विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांच्या एका टीमने 51 ते 80 वयोगटातील 2 हजार 2 लोकांना भरती केलं होतं. ज्यांच्या उठण्या-बसण्याची टेस्ट करण्यात आली.

Web Title: Are you at risk of an early death simple health tests show risk of early death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.