तुम्ही एक्सरसाइज अॅडिक्ट आहात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:12 PM2017-12-25T16:12:53+5:302017-12-25T16:14:01+5:30
धावपटू आणि बॉडीबिल्डर्समध्ये वाढतंय व्यायामाचं अॅडिक्शन..
- मयूर पठाडे
सर्वसामान्य सर्वच माणसांसाठी व्यायाम हा अविभाज्य भाग आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा तो अविभाज्य भाग असला पाहिजे इतंक व्यायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. लहान असो, किंवा मोठा, आपलं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, उत्साही, आनंदी दिर्घायुष्य हवं असेल तर व्यायामाशिवाय गत्यंतर नाही. अर्थातच हे साºयांना मान्य आहे, असतं आणि त्यासाठी त्यांचा बºयाचदा प्रामाणिक प्रयत्नही असतो.. पण अनेकांना मुख्य अडचण येते ती वेळेची. आपल्या व्यस्त दिनक्रमात व्यायामासाठी आणखी वेळ कुठून काढायचा यासासाठी..
खरंतर सर्वसामान्य व्यक्तींसाठी दिवसातला अर्धा-पाऊण तासाचा व्यायाम पुरेसा ठरू शकतो... पण काही जण असे असतात, त्यांचं अर्ध्या-पाऊण तासानं समाधान होत नाही. ते एक्सरसाइज अॅडिक्ट असतात. कितीही व्यायाम केला, तरी त्यांना तो पुरेसा वाटत नाही. अर्थातच हे प्रमाण कमी नाही आणि दिवसेंदिवस ते वाढतंच आहे, असं अभ्यासकांचं निरीक्षण आहे. समाजातले किमान दहा टक्के लोक असे आहेत, ज्यांना व्यायामाचं अॅडिक्शन आहे. हे अॅडिक्शन इतकं की, त्याशिवाय ते जगूच शकत नाहीत. व्यायामाच्या विचारानं आणि कृतीनं त्यांना घेरलेलं असतं. अर्थात यासंदर्भात अनेकांचं दुमतही आहे. अर्ध्या-पाऊण तासाच्या व्यायामानं तुम्हाला फारसा काहीच फायदा मिळत नाही किमान रोज दोन तास तुम्ही व्यायाम केलात, तर त्याचा तुम्हाला तब्बल चार पट फायदा मिळतो असंही अनेकांचं म्हणणं आहे.
अर्थात या वादात जरी गेलं नाही, तरी अति व्यायाम आणि सारखं व्यायामाच्याच विचारात असलेल्यांची संख्या वाढते आहे आणि त्यात पुरुषांबरोबर स्त्रियांचाही समावेश आहे.
ज्यांना व्यायामानं झपाटलेलं असतं, त्यात मुख्यत: दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे धावपटू आणि बॉडीबिल्डर्स.. असं अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यांनी अशा एक्सेसिव्ह व्यायामापासून दूर राहिलं पाहिजे आणि आटोक्यातच व्यायाम केला पाहिजे असा तज्ञांचा सल्ला आहे.
तुम्हीही या अॅडिक्शनमध्ये अडकला असाल तर थोडं सावधान..
त्यानं तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ शकतो.
अशा लोकांमध्ये काय लक्षणं दिसतात ते पाहूया पुढच्या भागात..