​गुडघेदुखीने त्रस्त आहात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 03:16 PM2016-12-16T15:16:53+5:302016-12-16T15:20:20+5:30

गुडघ्यामधील वंगण कमी झाल्याने महिला असो की पुरुष प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास सतावतोच. विशेषत: वृद्धावस्थेत हाडांमधील वंगण आणि शरीरातला फॉस्फरस नावाचे तत्त्व कमी होते.

Are you helpless? | ​गुडघेदुखीने त्रस्त आहात?

​गुडघेदुखीने त्रस्त आहात?

Next
डघ्यामधील वंगण कमी झाल्याने महिला असो की पुरुष प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास सतावतोच. विशेषत: वृद्धावस्थेत हाडांमधील वंगण आणि शरीरातला फॉस्फरस नावाचे तत्त्व कमी होते. याशिवाय पौष्टिक भोजनाची कमतरता, मानसिक तणाव, शरीरात रक्ताची कमतरता, भीती, शंका, रोग इत्यादी कारणांमुळेही हा रोग होतो. अशा परिस्थितीत आहाराचे पथ्य आणि काही घरगुती उपाय केले तर या त्रासापासून सुटका मिळू शकते. 

* पाण्यात थोडेसे मीठ टाकून गरम करा. त्यात कापड भिजवून त्याने गुडघ्याला १० मिनिटे नियमित शेक घ्या. यामुळे काही दिवसात तुमची गुडघेदुखी कमी होईल.

* अद्रक, सुंठ, काळीमिरी, मीठ आणि मध यांना सारख्या प्रमाणात दळून चूर्ण बनवा. या चूर्णला ४ ग्रॅम मधासोबत खाल्ल्यानंतर वेदना दूर होते.

* कच्चा बटाटा गुडघ्यावर पिसून लावा. असे केल्याने तुमची गुडघेदुखी थांबते.

* जेवणात काकडी आणि लसूण यांचे सेवन २ आठवडे केल्यानंतर तुमच्या गुडघ्याची वेदना दूर होईल.

* मोहरीच्या तेलात २ चमचे ओवा, ४ लसणाच्या पाकळ्या, २ अफीम आणि १ चमचा खसखस करुन वाटा. मग या तेलाला गाळून गुडघ्यावर मालिश करा. त्याने गुडघादुखी दूर होते.

Web Title: Are you helpless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.