Health tips: हदयाच्या विकारांवर रामबाण आहे 'या' झाडाची साल मात्र, अशाप्रकारे वापर केला तरच होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:47 PM2022-06-24T17:47:25+5:302022-06-24T17:53:07+5:30

अर्जुन वृक्षाची साल (Arjun Sal Benefit) अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र हृदयासंबंधित समस्या दूर करण्यासाठी अर्जुन साल खूपच फायदेशीर आहे.

arjun tree peel is extremely beneficial for blood pressure and heart diseases such as heart attack stroke etc | Health tips: हदयाच्या विकारांवर रामबाण आहे 'या' झाडाची साल मात्र, अशाप्रकारे वापर केला तरच होईल फायदा

Health tips: हदयाच्या विकारांवर रामबाण आहे 'या' झाडाची साल मात्र, अशाप्रकारे वापर केला तरच होईल फायदा

googlenewsNext

आपल्याकडे आयुर्वेदाने सांगितलेल्या अनेक औषधी वनस्पती आणि वृक्षाची कमी नाही. बरेचसे शारीरिक आणि मानसिक त्रास आपण आयुर्वेदाच्या साहाय्याने घरच्या घरी कमी करू शकतो. अर्जुन साल (Arjun Bark Benefit) आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून वापरली जाते. संपूर्ण अर्जुन वृक्ष (Arjun Tree) औषधी गुणांनी समृद्ध आहे. अर्जुन वृक्षाची साल (Arjun Sal Benefit) अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र हृदयासंबंधित समस्या दूर करण्यासाठी अर्जुन साल खूपच फायदेशीर आहे.

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आपले हृदय म्हणजेच आपले हार्ट असते. हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यावर अर्जुन वृक्षाच्या सालीचा उपयोग आणि त्याचे फायदे याबद्दल आतापर्यंत अनेक स्टडीज केल्या गेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अर्जुन सालीचा उपयोग (Arjun Sal Use) कसा करावा याची माहिती देणार आहोत.

अर्जुन साल वापरण्याची पद्धत

  • जेवण करण्यापूर्वी अर्जुन सालचे पावडर (Arjun Sal Powder) पाण्यात टाकून दिवसातून एक किंवा दोनवेळा घ्यावे. 50 एमल एवढ्या प्रमाणात हे घ्यावे.
  • पाण्याऐवजी दुधात टाकूनही ही पावडर घेतली जाऊ शकते.
  • अर्जुन सालीपासून बनलेल्या कॅप्सुलदेखील (Arjun Sal Capsule) बाजारात उपलब्ध आहेत. यांचादेखील वापर तुम्ही करू शकता.
  • 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा अर्जुन सालचे पावडर टाकून उकळून घ्या. पाणी उकळून अर्धे झाल्यावर गाळून कोमट झाल्यावर प्यावे.

हृदयासाठी फायदेशीर
तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत असतील तर अर्जुन सालीचे (Arjun Sal For Heart) सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अर्जुन साल हृदयाशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर फायदेशीर आहे. हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर अर्जुन सालचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. तसेच हृदयातील जळजळ दूर करण्यात मदत होते. हृदयाला बळ देण्यासाठी अर्जुन साल उपयुक्त ठरते.

रक्तदाब नियंत्रण
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अर्जुनची साल इतर औषधी वनस्पतींसोबत वापरली जाते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये डिस्पनिया आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर सुधारत असल्याचे दिसून आले आहे.

फुफ्फुसासाठी फायदेशीर
अर्जुन साल आयुर्वेदानुसार खोकला, दमा आणि काही संक्रमणांसह फुफ्फुसाच्या विकारांवरदेखील मदत करू शकते.

Web Title: arjun tree peel is extremely beneficial for blood pressure and heart diseases such as heart attack stroke etc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.