वजन कमी करण्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनर्सचा उपयोग करताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:46 PM2017-08-03T12:46:58+5:302017-08-03T12:48:08+5:30
स्लिम-ट्रिम होण्यासाठी कृत्रिम गोडव्याच्या ‘गोडी’चा गोड बोलून दगाफटका!
- मयूर पठाडे
मधुमेहाची चाहूल लागली किंवा आपण जाड होतो आहोत याचा साधा आभास जरी निर्माण झाला तरी अनेकांना अस्वस्थ व्हायला लागतं. त्यामुळे पहिली संक्रांत येते साखरेवर.
साखर सोडली म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल, मधुमेहही आटोक्यात येईल आणि वाढत्या वजनालाही ब्रेक बसेल असंच अनेकांना वाटत असतं.
त्यासाठी मग साखर खाण्यावर कंट्रोल आणला जातो, पण थोड्याच दिवसांत लक्षात येतं, या ‘गोडव्या’ची आपल्याला आता सवय झाली आहे. त्याशिवाय आपण राहूच शकत नाही. मग पर्याय शोधले जातात. सर्वात पहिला पर्याय समोर येतो तो म्हणजे आर्टिफिशिअल स्वीटनर्सचा. त्यामुळे साखरेऐवजी या कृत्रिम मोर्चाकडे मोर्चा वळवला जातो.
पण थांबा, वाढत्या वजनावर मानसिक कंट्रोल ठेवण्यापेक्षा आर्टिफिशिअल स्वीटनर्सच्या माध्यमातून तुम्ही कंट्रोल ठेऊ पाहात असाल, तर तुमचा हा मार्ग अतिशय चुकीचा आहे आणि लेने के देने पडू शकतील एवढं नक्की.
शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधनातून शोधून काढलं की वजन कमी करण्यासाठी तुम्ही अशा कृत्रिम गोडव्याचा वापर तुम्ही करत असाल, तर ते तुमच्यासाठी फारसं फायदेशीर नाही.
कारण अशा कृत्रिम गोडवा निर्माण करणाºया पदार्थात कॅलरीजची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि ती त्यात ठासून भरलेली असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे अर्थातच वजनही. त्यामुळे या पर्यायाचा काहीच उपयोग नाही.
शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन करताना एक अफलातून मार्ग शोधला. गोड पदार्थ आणि माशा यांचाही खूप जवळचा संबंध आह. त्यामुळे या अआर्टिफिशिअल स्वीटनर्सचा वापर त्यांनी माशांवरच केला.
त्यात त्यांना आढळून आलं, ज्या माशांना अशा कृत्रिम गोडव्याचे पदार्थ खाण्यास दिले, त्यांच्यातील कॅलरीत आणखी बºयाच मोठ्या प्रमाणात वाढल्याचं लक्षात आलं. त्याचवेळी ज्यांना या कृत्रिम गोडव्यापासून दूर ठेवलं होतं, त्यांच्यातील कॅलरीजची संख्या मात्र मर्यादित राहिली.
त्यामुळे वजन आटोक्यात ठेवायचं असेल तर या कृत्रिम गोडव्यापासून तुम्हाला दूरच राहावं लागेल आणि हा पर्याय सोडावा लागेल