शतावरी आहे गुणकारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 04:28 PM2017-01-07T16:28:18+5:302017-01-07T16:28:18+5:30
आयुर्वेदात शतावरी वनस्पतीचे महत्त्व खूपच आहे. स्त्रियांशी निगडीत आजार दूर करण्याबरोबरच शतावरीचे अनेक उपयोग आहेत. आज आपण शतावरीचे नेमके कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.
आयुर्वेदात शतावरी वनस्पतीचे महत्त्व खूपच आहे. स्त्रियांशी निगडीत आजार दूर करण्याबरोबरच शतावरीचे अनेक उपयोग आहेत. आज आपण शतावरीचे नेमके कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.
* शतावरीत असलेल्या फायको-इस्ट्रोजन हार्मोन प्रिकर्सरमुळे स्त्रियांमध्ये गर्भधारण क्षमता व ऊर्जा वाढवण्यासाठी मदत होते. यामुळेच या वनस्पतीला शंभर पुरुषांना वर बनवण्याची शक्ती आहे अशी म्हणजेच शतावरी हे नाव देण्यात आले आहे.
* शतावरी एक उत्तम औषध असून, स्त्रियांच्या प्रजनन संबंधित अवयवांसाठीही खूप उपयुक्त आहे.
* बहुतांश महिलांना मासिक पाळी येण्यापूर्वी खूप त्रास होतो. पाळीदरम्यान पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवत असतील तर शतावरी घेतल्यास नक्कीच लाभदायक ठरेल.
* स्मरणशक्ती कमी होणे तसेच रजोनिवृत्तीच्या काळात जळजळ होणे आदी समस्यांवर उपाय म्हणून शतावरी वापरता येते.
* बहुतेक पुरुषांना यौन समस्या आढळून येतात. या समस्या निवारणासाठीही शतावरी हे उत्तम औषध असल्याचे दिसून आले आहे.
* बाळंतीण स्त्रियांना दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढवण्यासाठी शतावरी उपयोगी आहे.
* शतावरीमुळे वाढत्या वयात येणारा थकवा तसेच कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
* शतावरीत अँटी बॅक्टेरिया, अँटी कॅन्सर व अँटी अल्सर गुण असल्याने पचनशक्ती सुधारुन पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
* शतावरीमुळे आॅक्सिडंट, बॅक्टेरिया, बुरशी यामुळे होणाºया रोगांपासून बचाव होण्यास मदत होते.
* शिवाय मनावरील ताणतणाव कमी होऊन मन शांत ठेवण्यासाठीही शतावरी उपयोगी आहे.