वायु प्रदूषणामुळे फुप्फुसाचं होणारं नुकसान Aspirin ने टाळता येतं - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 10:51 AM2019-10-07T10:51:29+5:302019-10-07T10:52:30+5:30

वायु प्रदूषणामुळे लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. त्यात फुप्फुसाचं देखील मोठं नुकसान होत आहे.

Aspirin may reduce air pollution harms study says | वायु प्रदूषणामुळे फुप्फुसाचं होणारं नुकसान Aspirin ने टाळता येतं - रिसर्च 

वायु प्रदूषणामुळे फुप्फुसाचं होणारं नुकसान Aspirin ने टाळता येतं - रिसर्च 

Next

(Image Credit : medicalnewstoday.com)

Aspirin ची गोळी खूप आधीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना आणि सूज दूर करण्यासाठी वापरली जाते. मात्र, आता एका नव्या रिसर्चमधून आणखी एक नवीन बाब समोर आली आहे. हा रिसर्च जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अ‍ॅन्ड क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये पब्लिश झाला आहे. कोलंबिया विश्वविद्यालया द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, Aspirin वायु प्रदूषणामुळे फुप्फुसांवर पडणाऱ्या नुकसानकारक प्रभावांना कमी करू शकते. 

या रिसर्चमध्ये बोस्टनच्या सरासरी ७३ वय असलेल्या २२८० पुरूषांना सहभागी करून घेण्यात आले होते. रिसर्चमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य आणि फुप्फुसाची काम करण्याची क्षमता याची टेस्ट करण्यात आली.

यासोबतच प्रत्येक व्यक्तीच्या फुप्फुसाच्या टेस्टचा रिझल्ट, Aspirin चा वापर करणाऱ्या आणि ब्लॅक कार्बनचं प्रमाण यांच्यातील संबंधाचं मूल्यांकन करण्यात आलं. तसेच इतर कारणांवरही लक्ष दिलं गेलं. जसे की, प्रत्येक व्यक्तीची पर्सनल मेडिकल हिस्ट्री मग ते रेग्युलर स्मोक करत असो वा नसो.

त्यानंतर अभ्यासकांना आढळलं की,  Aspirin च्या वापराने फुप्फुसाच्या काम करण्यावर ब्लॅक कार्बनचा नकारात्मक प्रभाव जवळपास अर्धा कमी केला. रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त लोक Aspirin घेत होते. त्यामुळे रिसर्चच्या लेखकांनी लिहिले की, रिसर्चचा निष्कर्ष मुख्य रूपाने Aspirin वरच लागू होतो. तसेच असेही म्हटले जाऊ शकते की,  Aspirin चा फुप्फुसाच्या काम करण्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि यावर पुढे आणखी रिसर्च करण्याची गरज आहे.  

अभ्यासकांची अंदाज आहे की,  Aspirin च्या वापराने फुप्फुसाच्या काम करण्यावर तर सकारात्मक प्रभाव पडतोच. सोबतच वायु प्रदूषणामुळे फुप्फुसावर येणारी सूजही कमी होते.

Web Title: Aspirin may reduce air pollution harms study says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.