आपल्याच चुकांमुळे अस्थमाचे शिकार होत आहेत तरूण, जाणून घ्या कसे...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:06 PM2022-08-01T18:06:57+5:302022-08-01T18:08:15+5:30
Asthma Treatments: भारतात जवळपास 20 मिलियन दम्याचे रूग्ण आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दावा केला आहे की, जर आपण आपल्या निसर्गाची काळजी घेतली नाही तर हा जीवघेणा आजार वाढत जाणार.
Asthma Treatments: लोकांच्या जीवनात अनेक प्रकारचे बदल झाले आहेत. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. पर्यावरणाबाबत सांगायचं तर तेही प्रदूषित झालं आहे. जगभरात सिगारेट, हुक्का आणि धुराची उत्पादने उपलब्ध आहे. ज्यांचं सेवन करून आपण स्वत:चं नुकसान करून घेत आहोत. यानेच वातावरणही खराब होतं. मनुष्यांनी स्वत:ला निसर्गापासून वेगळं केलं आहे. त्यामुळे कोरोना, मंकीपॉक्ससारखे संक्रमित आजार पसरत आहेत. याच कारणाने भारतात जवळपास 20 मिलियन दम्याचे रूग्ण आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दावा केला आहे की, जर आपण आपल्या निसर्गाची काळजी घेतली नाही तर हा जीवघेणा आजार वाढत जाणार.
आजच्या घडीला शहरांमध्ये दिवसाला साधारण मिलियन टन कचरा निघतो. ज्यावर अजूनही काही सुरक्षित उपचार मिळाला नाही. तो कुठे जाळावा आणि कुठे जाळू नये, अनेक भागांमध्ये कचऱ्यांचा डोंगर बघायला मिळतो आणि अनेक ठिकाणी काही विचार न करता तो जाळला जातो. यातून निघणारा प्रदूषित धूर तुमच्या फुप्फुसांना त्रास देतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही. त्याच कारणाने लोक दम्याचे शिकार होतात.
तुमचे फुप्फुसं तुमचं हृदय आणि मेंदूर मजबूत ठेवण्यास मदत करतं. जेव्हा तुम्ही शुद्ध ऑक्सीजन घेता तेव्हा तुमचा मेंदू अॅक्टिव राहतो आणि दिवसभर तुम्हाला चांगलं वाटतं. तेच जेव्हा तुम्ही कोणत्या धुराच्या पदार्थांचं सेवन करता जसे की, सिगारेट विडी, हुक्का तेव्हा शुद्ध ऑक्सीजनही विषारी बनतं. ज्यामुळे तुमचं फुप्फुस खराब होऊ लागतं. तेव्हा तुम्ही अस्थमाचे शिकार होता.
काय आहे उपाय?
रोज ऑफिसला जाणारे लोक आणि शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फुप्फुसं खराब होण्याची समस्या लवकर होऊ शकते. तुमच्यापैकी अनेक लोक सिगारेटचं सेवन करत असाल, तर काही लोक त्या धुराचेच शिकार होतात. अशात तुम्ही रोज 500 मीटर पायी चाललं पाहिजे आणि धावलं पाहिजे. जर तुमच्याकडे यासाठी वेळ नसेल तर घरात योगाभ्यास करा. याने तुमची फुप्फुसं निरोगी आणि मजबूत राहतील.