थंडीच्या दिवसात वाढतो अस्थमा अटॅकचा धोका, 'या' गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:30 PM2023-01-09T16:30:50+5:302023-01-09T16:31:13+5:30

Asthma attacks : कमी होणाऱ्या तापमानामुळे अस्थमाच्या रूग्णांचा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे अस्थमा असलेल्या लोकांनी हिवाळ्यात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं.

Asthma patients follow these tips to avoid asthma attacks during winter | थंडीच्या दिवसात वाढतो अस्थमा अटॅकचा धोका, 'या' गोष्टींची घ्या काळजी!

थंडीच्या दिवसात वाढतो अस्थमा अटॅकचा धोका, 'या' गोष्टींची घ्या काळजी!

Next

Asthma attacks : अस्थमा म्हणजेच दम्याच्या रूग्णांसाठी हिवाळा हा फारच त्रासदायक असतो. हवेत वाढणारे प्रदूषण कण आणि कमी होणाऱ्या तापमानामुळे अस्थमाच्या रूग्णांचा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे अस्थमा असलेल्या लोकांनी हिवाळ्यात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं. याने त्यांना होणार त्रास कमी करण्यास मदत मिळेल. 

स्वच्छतेची घ्या काळजी

हात-तोंड धुवत राहणे हा अस्थमाच्या अटॅकपासून बचाव करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. साबण आणि पाण्याने सतत हात धुवत राहिल्याने सर्दी-खोकला किंवा इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होऊ शकतो. यासोबत हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायजर आणि वेट वाइप्सचा वापरही तुम्ही करू शकता. मात्र, सॅनिटायजरचा अधिक वापर करणं महागात पडू शकतं.

आगीपासून दूर रहा

हिवाळ्यात आगीजवळ बसणे अनेकांना आवडतं. पण आगीजवळ बसल्याने किंवा शेकोटीवर हात शेकल्याने अस्थमाच्या रूग्णांची समस्या अधिक वाढू शकते. तसेच धूर श्वासांच्या माध्यमातून श्वसननलिकेत पोहोचतो. आणि अस्थमा अटॅक येऊ शकतो. त्यामुळे असं करणं टाळा.

तोंड झाकून ठेवा

हिवाळ्यात अस्थमाच्या रूग्णांनी आपलं तोडं शक्य तेवढ झाकून ठेवलं पाहिजे. हे त्यांच्या फुप्फुसासाठी चांगलं होईल. तोंड उघड राहिल्याने फुप्फुसात थंडी हवा जाते, ज्यामुळे अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. नाकाने श्वास घेतल्यास ही शक्यता कमी राहते. त्यामुळे तोंड स्कार्फ किंवा दुपट्ट्याने झाकून ठेवा.

Web Title: Asthma patients follow these tips to avoid asthma attacks during winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.