काळजी घ्या; ATM वापरणं ठरू शकतं आजाराला आमंत्रण... जाणून घ्या कसं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:44 PM2019-04-24T12:44:38+5:302019-04-24T12:49:50+5:30
आपण सारेच एटीएम मशीनचा वापर करतो. एटीएममुळे अडीअडचणीच्या वेळी किंवा वापरण्यासाठी पैसे काढणं अगदी सोपं झालं आहे. त्यासाठी तुम्हाला तासभर बँकेच्या लाइनमध्ये उभं राहण्याची गरज भासत नाही.
(Image Credit : Dawn)
आपण सारेच एटीएम मशीनचा वापर करतो. एटीएममुळे अडीअडचणीच्या वेळी किंवा वापरण्यासाठी पैसे काढणं अगदी सोपं झालं आहे. त्यासाठी तुम्हाला तासभर बँकेच्या लाइनमध्ये उभं राहण्याची गरज भासत नाही. अनेकजण तर पैसे सांभाळण्याऐवजी गरज पडेल तेव्हा एटीएममध्ये जाऊन पैसे काढतात. अशातच जर तुम्हाला असं सांगितलं की, एटीएम मशीनवर गंभीर आजार पसरवणारे अनेक किटाणु असतात. गोंधळून गेलात ना?... हो खरचं.... एका संशोधनामधून ही बाब सिद्ध झाली आहे.
काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून अशी गोष्ट सिद्ध झाली की, तुमच्या फोनच्या स्क्रिनवर टॉयलेट सीटएवढे बॅक्टेरिया असतात. तेव्हापासून काही लोक आपल्या फोनची स्क्रिन डिसइन्फेक्टेंटचा वापर करून स्वच्छ करत आहेत. परंतु या घातक किटाणुंपासून किती वेळापर्यंत बचाव करता येऊ शकतो. आता आणखी एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं की, एटीएम मशीन्सवरही टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणु असतात. हेच किटाणु अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतात.
(Image Credit : Livemint)
एटीएम मशीन्स सध्याची गरज बनल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी एटीएम मशीन्स असल्यामुळे लोक जास्त कॅश घेऊन येत नाहीत आणि एटीएम मशीन्सचा खूप वापर करतात. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, एटीएम मशीन्सच्या की-पॅड्सवर पब्लिक टॉयलेट सीट्सप्रमाणे किटाणु अस्तित्त्वात असतात.
रिसर्च
ब्रिटनच्या रिसर्चर्सनी एटीएम मशीन्स आणि पब्लिक टॉयलेट्सचे स्वॅब्स घेतले आणि त्यांची तुलना केली. दोन्ही स्वॅब्समध्ये असे किटाणु आढळून आले. ज्यांमुळे डायरियाप्रमाणे घातक आजार होऊ शकतात.
मायक्रोबायोलॉजिस्ट रिचर्ड हैसिंग यांनी सांगितले की, हे परिणाम पाहून त्यांनांही आश्चर्यच वाटले होते. एटीएम मशीनवर तसेच बॅक्टेरिया होते, जसे एका पब्लिक टॉयलेटमध्ये होते. दरम्यान हा रिसर्च एक अॅन्टीबॅक्टेरियल प्रॉडक्ट्स विकणाऱ्या एका बायोकोट द्वारे करण्यात आला होता.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही.