वडिलांच्या निकोटीन सेवनामुळे बाळांना अटेंशन डेफिसिटचा धोका, कारणे आणि उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:31 AM2018-10-23T10:31:21+5:302018-10-23T10:32:12+5:30
महिलांना फार पूर्वीपासून गर्भवस्थेदरम्यान धुम्रपान न करण्याचा सल्ला दिला जातो. पण निकोटीनच्या पुरुषांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मुलांसोबत आणि नातवंडांसोबत काही समस्या होऊ शकतात.
महिलांना फार पूर्वीपासून गर्भवस्थेदरम्यान धुम्रपान न करण्याचा सल्ला दिला जातो. पण निकोटीनच्या पुरुषांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मुलांसोबत आणि नातवंडांसोबत काही समस्या होऊ शकतात. उंदरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात अभ्यासकांनी हा निष्कर्ष काढला आहे. यात भारतीय वंशांच्या वैज्ञानिकांचाही समावेश आहे. या अभ्यासात आढळले की, निकोटीन घेतल्यानंतरही वडिलांचा व्यवहार सामान्य असतो, पण त्यांच्या मुला-मुलींमध्ये या कारणाने हायपरअॅक्टिविटी, अटेंशन डेफिसिट आणि कॉगनिटिव इनफ्लेक्सिविटीसारख्या समस्या होऊ शकतात.
अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक प्रदीप भीडे यांनी सांगितले की, अनेकदा डॉक्टर पुरुषांना हे सांगत नाहीत की, त्यांच्या धुम्रपानामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला नुकसान होत आहे. हे नुकसान महिला अजिबात धुम्रपान करत नसेल तरीही होतं.
काय आहे अटेंशन डिफिसिट
अटेंशन डिफिसिट याला एडीएचडी असेही म्हटले जाते. हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे. हा आजार लहान मुलं आणि मोठ्यांनाही होऊ शकतो. पण लहान मुलांना हा आजार अधिक होण्याचा धोका असतो. हा आजार झाल्याने व्यक्तीच्या व्यवहारात फरक बघायला मिळतो आणि स्मरणशक्तीही कमजोर होते. तसेच याला दुसऱ्या शब्दात सांगायचं तर एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता योग्य प्रकारे न वापरणे असेही म्हटले जाते. ही समस्या काही केमिकल्सच्या वापराने मेंदूच्या कमजोरीचं कारण ठरतात.
काय आहेत अटेंशन डिफिसिटची कारणे?
एडीएचडीच्या निश्चित कारणांची माहिती अजून मिळाली नाहीये, पण याच्या अनेक कारणांचा अंदाज लावला जातो. त्यात आनुवांशिकता, शरीरात हार्मोन बदलणे, साखर आणि रिफाइंड फूडचं अधिक सेवन, वेळेआधी जन्म होणे आणि डोक्याला झालेली एखादी इजा असे सांगितले जातात.
काय आहे यावर उपाय?
जर मुलांच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं की, मुलांच्या अभ्यासात अडचण आहे, त्यांचा व्यवहार इतरांपेक्षा वेगळा आहे आणि त्यांचं लक्ष लागत नाही तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही समस्या सामान्य नाहीये. लहान मुलांमधील ही समस्या दूर करण्यासाठी मेडिसीनल ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. त्यासोबत अनेक थेरपींचाही वापर केला जाऊ शकतो.