वैज्ञानिकांची कमाल! सिनेमात दाखवतात तशा आता आपोआप भरतील जखमा, जोडले जातील अवयव.....
By अमित इंगोले | Published: January 16, 2021 09:49 AM2021-01-16T09:49:25+5:302021-01-16T09:51:41+5:30
वैज्ञानिकांनी असा स्टेम सेल डेव्हलप केलाय ज्याने तुम्हाला शरीरावर कापलेला भाग दुरूस्तही होईल आणि तुमच्या जखमाही आपोआप भरल्या जातील.
हॉलिवूडच्या किंवा बॉलिवूडच्या अनेक सुपरहिरो सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, त्या व्यक्तीमध्ये काही सुपर नॅच्युरल पॉवर असतात किंवा वैज्ञानिकांच्या मदतीने त्यांच्यात असे स्टेम सेल विकसित केलेले असतात ज्यांच्या मदतीने त्यांच्या शरीरावरील जखमा आपोआप भरतात. विन डीजलच्या ब्लडशूटमध्येही विन डीजलची अशीच भूमिका होती. मात्र, आता हे केवळ सिनेमात नाही तर प्रत्यक्षातही होणार आहे. ही कमाल केली आहे ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी. त्यांनी एक असा स्टेम सेल डेव्हलप केलाय ज्याने तुम्हाला शरीरावर कापलेला भाग दुरूस्तही होईल आणि तुमच्या जखमाही आपोआप भरल्या जातील.
स्मार्ट स्टेम सेल
वैज्ञानिकांना याला स्मार्ट स्टेम सेल असं नाव दिलं आहे. हा स्टेम सेल मनुष्याच्या शरीरातून सहजपणे काढता येऊ शकतो. हा मनुष्याच्या शरीरातील चरबीचा रिप्रोग्रम्ड व्हर्जन आहे. फॅटच्या रिप्रोग्राम्ड व्हर्जनलाच स्टेम सेल म्हटलं जाईल. या स्टेम सेलने उंदरांवर प्रयोग करण्यात आला. या यशातून वैज्ञानिकांना रिजनरेटीव्ह एबिलिटी असलेल्या स्टेम सेलची आशा मिळाली. हा रिसर्च ऑनलाइन सायन्स जर्नल सायन्स अॅडव्हान्समध्ये प्रकाशित झाला आहे. मनुष्यांवर प्रयोग करण्याआधी वैज्ञानिकांना या स्टेम सेलवर आणखी काही टेस्ट आणि रिसर्च करायचे आहेत.
यूनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्समधील प्राध्यापक जॉन पिमांडा म्हणाले की, हा स्टेम सेल जखमी झालेले टिश्यू स्वत:हून जोडण्यात मदत करेल. म्हणजे आपोआप तुमचे घाव भरले जातील. तेही लगेच सिनेमाप्रमाणे. जसे की, सरडा आपला रंग बदलतो आणि शेपटी कापली गेली तर पुन्हा शेपटी येते ठीक तसंच हे असेल.