एका वर्षात एका व्यक्तीच्या पोटात जातात प्लॅस्टिकचे 'इतके' हजार कण, आकडा वाचून व्हाल थक्क...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 11:46 AM2019-09-04T11:46:08+5:302019-09-04T11:54:05+5:30
प्लॅस्टिकच्या बॉटलच्या माध्यमातून कशाप्रकारे आपल्या शरीरात प्लॅस्टिक जातं हे काही दिवसांपूर्वीच रिसर्चमधून समोर आलं होतं.
(Image Credit : dailymail.co.uk)
प्लॅस्टिकच्या बॉटलच्या माध्यमातून कशाप्रकारे आपल्या शरीरात प्लॅस्टिक जातं हे काही दिवसांपूर्वीच रिसर्चमधून समोर आलं होतं. आता दुसऱ्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, एक व्यक्ती वर्षभरात ७३ हजार प्लॅस्टिकचे बारिक कण गिळंकृत करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ व्हियन्नाने हा रिसर्च केलाय. वैज्ञानिकांनुसार, व्यक्तीच्या शरीरात मायक्रोप्लॅस्टिक जाण्याचं मुख्य माध्यम समुद्री जीव आहेत. जे खाल्ले जातात. हे प्लॅस्टिक आतड्यांना संक्रमित करत आहे.
दररोज इतकं ग्रॅम प्लॅस्टिक निघतं
(Image Credit : living.anveya.com)
मुख्य वैज्ञानिक डॉय फिलिप श्र्वॉबल म्हणाले की, एका दिवसात एका व्यक्तीच्या पोटात मायक्रोप्लॅस्टिकचे २०० तुकडे जातात. एका वर्षात हा आकडा ७३ हजार इतका होतो. बॉटलमधील पाण्यासोबतच समुद्री जीवही यांचं माध्यम आहे. समुद्री जीव हे समुद्रात फेकलेला कचरा खाता आणि तो पुन्हा आपल्याच ताटात येतो. वैज्ञानिकांना सरासरी प्रति दहा ग्रॅम मानवी विष्ठेत २० मायक्रोप्लॅस्टिकचे तुकडे आढळले.
(Image Credit : economictimes.indiatimes.com)
डॉ. फिलिप यांच्यानुसार, पहिल्यांदाच मानवी विष्ठेचा अभ्यास शरीरात पोहोचणाऱ्या प्लॅस्टिकच्या प्रमाणाबाबत जणून घेण्यासाठी करण्यात आला. वैज्ञानिक बऱ्याच दिवसांपासून हा रिसर्च करत होते. अखेर त्यांना प्लॅस्टिक मानवी शरीरात पोहोचतं कसं? याचं उत्तर मिळालं. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, प्लॅस्टिकचे बारिक कण शरीरात पोहोचून विषारी रसायनात बदलू शकतात. तसेच हे रक्तप्रवाहात मिळून लिव्हरसहीत शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचतात.
(Image Credit : thehagueinstituteforglobaljustice.org)
डॉ. फिलिप यांनी सांगितले की, विष्ठेत मायक्रोप्लॅस्टिक आढळण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटल अधिक जबाबदार आहेत. वैज्ञानिकांच्या टिमने प्लॅस्टिकच्या सात इतर रूपांचाही शोध लावला. त्यांनी सल्ला दिला की, प्लॅस्टिक शरीरात पोहोचण्याचे अनेक स्त्रोत आहेत. काही लोक प्रदूषित हवेत श्वास घेतात, धुळीतही हे कण असतात. मायक्रोप्लॅस्टिकचा आकार ५ मिमीपेक्षाही कमी असतो.
जगभरात प्लॅस्टिकचं उत्पादन दरवर्षी वेगाने वाढत आहे. हा शोध मांसाहार करणाऱ्या लोकांवर करण्यात आला. रिपोर्टमधून समोर आले की, समुद्री जीव जसे की, फिश, झिंगे यांच्या माध्यमातून मायक्रोप्लॅस्टिकची कण शरीरात जात आहेत. गेल्या काही वर्षात मायक्रोप्लॅस्टिक समुद्रातील पाण्यात, अन्नात, हवेत आणि पाण्याच्या बॉटल व नळाच्या पाण्यातही आढळलं आहे.
गेल्या महिन्यात WHO ने हे रोखण्यासाठी पाऊल उचलले होते. पिण्याच्या पाण्यातून मायक्रोप्लॅस्टिकच्या संपर्कात येऊन प्रत्येक व्यक्तीला होणाऱ्या धोक्यांबाबत विश्लेषण केलं होतं. WHO याची माहिती घेणार आहे की, सर्वात बारिक कण कुठून येताहेत आणि पाण्यातल्या पाण्यात यांना कसं रोखलं जाऊ शकेल.