श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:55 PM2024-07-30T13:55:39+5:302024-07-30T13:56:42+5:30

Pulses In Shravan : श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

Avoid 5 Pulses from eating in Shrawan season due to heavy in digestion | श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा!

श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा!

Pulses In Shravan : डाळींचं सेवन आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न भरपूर असतं. डाळींच्या सेवनाने शरीराची कमजोरी दूर होण्यास मदत मिळते. पण वातावरण बदलानुसार आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या आहारात बदल केला पाहिजे. श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

पावसाळ्यात आपली पचनक्रियां कमजोर होत असते. आपण जे खातो ते पचवण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे आहाराची काळजी घेतली पाहिजे. काही डाळी पचनास जड असतात. व्यवस्थित न शिजवल्याने गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या होतात. ज्या लोकांना आधीच या समस्या आहेत त्यांनी खालील डाळींचं सेवन करू नये.

कोणत्या डाळी खाऊ नये

पावसाळ्यात पचन तंत्र कमजोर झाल्यामुळे मसूरची डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, तुरीची डाळ, राजमा यांचं सेवन कमी करावं.

काय कराल उपाय?

जर तुम्हाला या दिवसांमध्ये या डाळींचं सेवन करायचं असेल तर त्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. या डाळी शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवाव्या. भाजी करताना त्यात आलं, काळी मिरे, जिरं, हींग टाकावा. याने तुमची पचनक्रिया चांगली होते.

वजन कमी करण्यास मदत

डाळी आणि राजमा एका कॅटेगरीमध्ये येतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, यांच्या सेवनाने फॅट आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं. यात भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलं राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

एनर्जी मिळेल

डाळींमध्ये हेल्दी कार्ब्स भरपूर असतात. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे सेल्स डॅमेज होण्याचा धोका टाळला जातो. डाळींमधील आयर्नमुळे हीमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीराची ताकद वाढते.

Web Title: Avoid 5 Pulses from eating in Shrawan season due to heavy in digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.