सर्दी-खोकला झाल्यास हे खाणे टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 04:06 PM2017-01-03T16:06:40+5:302017-01-03T16:10:41+5:30

संसर्गामुळे हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास बहुतेक जणांना सतावतो. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा त्रास तुम्हाला वारंवार होण्याची शक्यता असते.

Avoid eating cough if it is cough! | सर्दी-खोकला झाल्यास हे खाणे टाळा !

सर्दी-खोकला झाल्यास हे खाणे टाळा !

googlenewsNext
सर्गामुळे हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास बहुतेक जणांना सतावतो. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा त्रास तुम्हाला वारंवार होण्याची शक्यता असते. यासाठी सर्दी-खोकला झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. यादरम्यान काही गोष्टी खाणे टाळल्यास तुम्ही लवकर बरे होऊ शकता. 



* तळलेले अन्नपदार्थ :
तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स जास्त प्रमाणात असल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकत नाही. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास तळलेले अन्न टाळा.

* केळी व आंबट फळे :
केळी व आंबट फळांमुळे श्वसन प्रणालीवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे यादरम्यान असे खाणे टाळावे. 

* मद्यसेवन :
मद्यसेवनानेही रोगप्रतिकारशक्ती कमी होते शिवाय मद्यसेवनाने तुम्ही डिहायड्रेट होता. यामुळे सर्दी-खोकला आणखी वाढू शकतो.

* मैदा व साखर :
साखर व मैदायुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी-खोकला असताना साखर व मैदा खाऊ नये.

* दुग्धजन्य पदार्थ :
सर्दी-खोकला दरम्यान दूध, पनीर, दही, लोणी आदी दुग्धजन्य पदार्थ कटाक्षाने टाळावेत. कारण या पदार्थांमुळे अगोदरच शरीरात कफ तयार होतात.

Web Title: Avoid eating cough if it is cough!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.