'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:52 PM2020-09-02T15:52:23+5:302020-09-02T15:54:54+5:30

भारतील काही आरोग्य तंज्ञांनी PM  मोदींना पत्र लिहिलं आहे. लोकांना लसीबाबत कोणत्याही प्रकारच्या गैरसमजात न ठेवण्याचं आवाहन या पत्राद्वारे केलं आहे.

Avoid false hope on coronavirus vaccine health experts write to pm modi | 'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र

'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचण्या इतर देशांप्रमाणेचही भारतातही सुरू आहेत. १५ ऑगस्टला पंतप्रधान मोंदींनी सांगितले  होते. की, भारतात सध्या एक नाही तर तीन लसींच्या चाचण्या सुरू आहेत. यावर्षांच्या शेवटापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते असं मत त्यांनी लोकांसमोर व्यक्त केली होती. दरम्यान भारतातील काही आरोग्य तज्ञ मोदींच्या मताशी सहमत नाहीत. भारतील काही आरोग्य तंज्ञांनी PM  मोदींना पत्र लिहिलं आहे. लोकांना लसीबाबत कोणत्याही प्रकारच्या गैरसमजात न ठेवण्याचं आवाहन या पत्राद्वारे केलं आहे.

आरोग्य तंज्ञांच्या संयुक्त टास्क फोर्सनं मोदींना पत्र लिहून सांगितले की, कोरोना व्हायरसची लस लवकर उपलब्ध होणार नाही हे आपण मान्य करायला हवं. कोरोनावर रामबाण उपचार लवकरात लवकर मिळतील अशी खोटी अपेक्षा लोकांना दाखवू नये. इंडियन पब्लिक हेल्थ एसोसिएशन (IPHA),इंडियन एसोसिएशन ऑफ प्रिवेंटिव एंड सोशल मेडिसिन (IAPSM)आणि  इंडियन एसोसिएशन ऑफ एपिडेमियोलॉजिस्ट (IAE) यांनी हे ज्वाइंट स्टेटमेंट दिले आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी या ज्वाइंट स्टेटमेंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतात  पसरत असलेल्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी  लसीचे कोणतेही योगदान नाही. येत्या काही दिवसात कोरोनाची लस मिळणार नाही हे मान्य करायला हवं.  जेव्हा भारतात प्रभावी, सुरक्षित आणि परिणामकारक लस तयार होईल तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या  नियोजनानुसार वितरण केलं जाणार आहे. शाळा कॉलेज सुरू करण्याबाबतही तज्ज्ञांनीही सल्ला दिला आहे.

लॉकडाऊन आता पूर्णपणे हटवायला हरकत नाही. फक्त प्रतिबंधित  आणि कोरोनाबाधित क्षेत्रात लॉकडाऊन असायला हवा. तसंच कोरोनाचं संक्रमण रोखण्यासोबतच कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंवर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवं. लोकांना आपल्या लक्षणांकडे लक्ष देण्याचे, टेस्टिंग करण्याचे आणि जवळच्या आरोग्यकेंद्रातून तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. माहामारीच्या काळात परिणामकारक लस मिळण्यासाठी योजना आखल्या जायला हव्यात. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे. शैक्षणिक संस्था आणि संस्था सुरू करण्याबाबत विचार करायला हवा असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

हे पण वाचा-

चिंताजनक! 'या' कारणामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय कोरोना

नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल

खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात

Web Title: Avoid false hope on coronavirus vaccine health experts write to pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.