जेवणानंतर 'या' चुका करणं पडू शकतं महागात, तुम्हीही करत असाल तर वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:50 PM2024-09-16T13:50:26+5:302024-09-16T14:17:55+5:30
Mistakes After Meal : डायटिशिअन मानसी यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, जेवण केल्यावर काही चुका अजिबात करू नये.
Mistakes After Meal : जेवण आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. जेवणातून शरीराला वेगवेगळे पोषक तत्व मिळतात. यातून शरीराला प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, फायबर असे पोषक तत्व मिळतात. मात्र, जेवण केल्यावर काही लोक अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना पोषक तत्व मिळत नाहीत.
डायटिशिअन मानसी यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, जेवण केल्यावर काही चुका अजिबात करू नये. या काही चुकीच्या सवयी आहेत ज्या लगेच बदलायला हव्यात. यातील काही सवयी हेल्दीही वाटू शकतात, पण त्या शरीराला नुकसान पोहोचवतात.
मिठाई किंवा चॉकलेट
जेवण केल्यावर काहीतरी गोड खाण्याची वेगळीच मजा असते. पण यामुळे तुमचं ब्लड ग्लूकोज वेगाने वाढू शकतं. याजागी ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि क्रेविंग बंद करण्यासाठी डार्क चॉकलेटचा एक तुकडा खा किंवा नॅचरल स्वीटनर निवडा.
चहा-कॉफी
जेवणानंतर चहा किंवा कॉफीचा एक कप अनेक लोकांना सवयीसारखा असतो. पण चहा किंवा कॉफीमधील टॅनिन अन्नातील पोषक तत्व अॅब्जॉर्ब होण्यात अडथळा निर्माण करतं. याजागी हर्बल टी ची निवड करा.
फळं किंवा ज्यूस
फळं खाणं हेल्दी असतं, पण जेवणानंतर लगेच यांचं सेवन केल्याने डायजेस्टिव सिस्टमवर लोड येऊ शकतो. यामुळे अन्नाचा ग्लायसेमिक लोड वाढतो आणि जेवणानंतर लगेच शुगर वाढते. न्यूट्रिएंट्सचा पूर्ण फायदा उठवण्यासाठी जेवणाच्या आधी किंवा नंतर स्नॅक म्हणून फळं खावेत.
जास्त पाणी पिणं
शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने डायजेस्टिव एंजाइम कमजोर होऊ शकतात. याने पोषक तत्वांचं अवशोषण कमी होतं. हायड्रेट राहण्यासाठी दिवसभर पाणी पित राहिलं पाहिजे.
झोपणे
जेवण केल्यानंतर लगेच काही लोकांना झोप येते. पण जेवल्यावर लगेच झोपल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि अपचन होऊ शकतं. डायजेशन वाढवण्यासाठी जेवण केल्यावर थोडं चालण्याची सवय लावा.