वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीस टाळण्यासाठी खास उपाय, एकदा करा मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 11:05 AM2019-09-18T11:05:51+5:302019-09-18T11:11:45+5:30
वजन कमी करायचं असेल आणि सोबतच डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी रिसर्चमधून एक उपाय सांगण्यात आला आहे.
(Image Credit : medicalnewstoday.com)
जर साधारण एक आठवड्यापर्यंत Vegan फूडचा आहारात समावेश केला तर साधारण अर्धा किलो वजन कमी केलं जाऊ शकतं, असा दावा केला जातो. त्यासोबतच याने डायबिटीसचा धोकाही कमी करण्यास मदत मिळते, असा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
प्लांट बेस्ड वेगन डाएटचं करा सेवन
(Image Credit : theconversation.com)
अमेरिकेतील हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात वैज्ञानिकांना आढळलं की, वेगन डाएटने पचनशक्ती मजबूत होते. वेगन डाएट ही झाडांवर आधारित म्हणजेच प्लांट बेस्ड डाएट असते आणि यात मांस व डेअरी प्रॉडक्टचा समावेश केला जात नाही. अमेरिकन वैज्ञानिकांनी वॉशिंग्टनमध्ये साधारण १४८ लोकांना या टेस्टमध्ये सहभागी करून घेतले होते.
यातील ७३ लोकांना ४ महिन्यांपर्यंत मांस आणि डेअरी उत्पादनांपासून दूर ठेवण्यात आलं. यातून असं समोर आलं की, प्लांट बेस्ड आहार घेणाऱ्या लोकांमध्ये टाइप २ डायबिटीसचा धोका २३ टक्क्यांनी कमी होता. सोबतच वेगन ग्रुपमधील लोकांनी ५.८ किलो वजनही कमी केलं.
वजन होईल कमी, ब्लड शुगर राहील कंट्रोल
हा नवा रिसर्च यावर्षी बार्सिलोनामध्ये झालेल्या युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटीसच्या वार्षिक बैठकीत सादर केला होता. या रिसर्चमध्ये ही बाब सांगण्यात आली की, जर एखादी व्यक्ती १६ आठवड्यांपर्यंत केवळ वेगन पदार्थांचं सेवन केलं तर याने पचनक्रिया मजबूत करणारे बॅक्टेरिया अधिक चांगले होता. ज्याने केवळ शरीराचं वजनच कमी होत नाही तर ब्लड शुगरही कंट्रोल राहण्यास मदत होते.
वेगन डाएटमध्ये काय खावं?
(Image Credit : www.health.com)
वेगन डाएटमध्ये मांसाहार आणि डेअर प्रॉडक्ट्सचं सेवन केलं जात नाही. त्याऐवजी ताजी फळे, भाज्या, डाळी, कडधान्य, चिया सिड्स, नट्स, सोयाबीन, इतर डेअरी प्रॉडक्ट्स जसे की, सोया मिल्क, ओट्स मिल्क इत्यादींचं सेवन केलं जातं.