कोणत्याही त्रासासाठी गोळ्या घेताना करू नका ही चूक; डॉक्टरांनी सांगितली शरीरासाठी घातक ठरणारी सवय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:57 PM2021-03-17T18:57:15+5:302021-03-17T19:09:26+5:30
Health Tips in Marathi : काही वेळा असेही होऊ शकते की औषधाचा आजारावर गुणकारी ठरत नाहीत. कारण त्यांचा प्रभाव निष्क्रीय झालेला असतो.
सध्याच्या व्यस्त आणि ताण तणावाच्या जीवनशैलीत डोकेदुखी, थकवा, ताप येणं या समस्या जाणवणं सामान्य आहे. अनेकदा लवकर बरं वाटावं म्हणून लोक सुमो, डोलो, पॅरासिटॅमॉल, व्हिक्स एक्शन 500 अशा गोळ्या घेतात. ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा कोणतीही समस्या असो अनेकदा लोक ज्यूस किंवा चहासोबत गोळ्या घेतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार औषधं पाण्यासोबतच घ्यायला हवीत. काहीजण औषधांचा कडवटपणा जाणवू नये म्हणून ज्यूस, चहासोबतही गोळ्या गिळतात.
चहा, ग्रीन टी, दूध किंवा पाण्याच्या जागी रस घेऊन औषध घेतल्याने शरीरावर काय परिणाम होतो. याबाबत वरिष्ठ सल्लागार, डॉ. अंजू सूर्यपाणी, मेट्रो हॉस्पिटल, नोएडा यांनी सांगितले की, ''चहामध्ये टॅनिन असतात जे औषधात असलेल्या घटकांसह शरीरात रासायनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. इतकेच नव्हे तर चहा आणि कॉफीसह औषध घेतल्याने औषधाचा परिणामही कमी होतो आणि काही वेळा असेही होऊ शकते की औषधं आजारावर गुणकारी ठरत नाहीत. कारण त्यांचा प्रभाव निष्क्रीय झालेला असतो.''
रसासह औषधं घेऊ नका
रसासंदर्भात डॉ. अंजू म्हणाल्या, की जर तुम्ही रस घेऊन औषध घेतले तर यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही येऊ शकतात आणि औषधाचा परिणामही कमी होतो रुग्णाची रिकव्हर प्रक्रिया मंदावते. कर्करोगाच्या औषधांव्यतिरिक्त संत्री, सफरचंद आणि द्राक्षाचा रस देखील एंटीबायोटिक्सचा प्रभाव कमी करते.
एका संशोधनात असे दिसून आले आहे की द्राक्षाच्या रसावर औषध घेतल्यानंतर केवळ अर्धे औषधच शरीरात जाऊ शकते. रस औषध शोषण्याची क्षमता कमी करतो. जर आपण आजारी असाल आणि आपल्याला रस पिण्याचा सल्ला दिला गेला असेल तर तो रस स्वतंत्रपणे प्यावा, औषधानसह घेऊ नये. औषधाच्या आधी आणि नंतर रस पिऊ नका.
ग्रीन टीसह औषध घेऊ नका
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु डॉक्टरांनी लिहून दिलेली कोणतीही औषधं त्यासोबतच खाऊ नका, कारण ग्रीन टीमधील काही घटक, विशेषत: चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य औषधाने प्रतिक्रिया देऊ शकते आणि शरीराला हानी पोहोचवू शकते. म्हणूनच सदैव पाण्यासोबतच औषध घ्या. जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्