उन्हाळ्यात आहारातून गायब करा या गोष्टी, नाही तर पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 11:33 AM2023-05-16T11:33:49+5:302023-05-16T11:34:19+5:30

Health Tips : सध्या उन्हाळा सुरू आहे. सगळीकडे सूर्य भयानक आग ओकतोय. यादरम्यान कलिंगड, लिंबू पाणी, लस्सी यांसारख्या थंड फळांचं, पेयांचं सेवन सुरू असतं.

Avoid these 10 foods and drinks in summer you should know | उन्हाळ्यात आहारातून गायब करा या गोष्टी, नाही तर पडू शकतं महागात!

उन्हाळ्यात आहारातून गायब करा या गोष्टी, नाही तर पडू शकतं महागात!

googlenewsNext

Health Tips : वातावरण बदलाचा आपल्या आरोग्यावर फार प्रभाव पडत असतो. तुम्ही जे काही खाता किंवा पिता त्याचा प्रभाव शरीरावर पडतो. अशात असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच सेवन काही वातावरणात करणं महागात पडू शकतं. याने आरोग्याचं नुकसान होतं.

सध्या उन्हाळा सुरू आहे. सगळीकडे सूर्य भयानक आग ओकतोय. यादरम्यान कलिंगड, लिंबू पाणी, लस्सी यांसारख्या थंड फळांचं, पेयांचं सेवन सुरू असतं. याने शरीराला थंडावा मिळतो. पण काही असे पदार्थ किंवा पेय आहेत ज्यांचं सेवन या दिवसात फार घातक ठरू शकतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

कॉफी - जर तुम्हाला या तापत्या उन्हातही हाइड्रेट रहायचं असेल तर कॉफीचं सेवन बंद करा. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणं फार गरजेचं असतं. कॉफी शरीराला डिहायड्रेट करते. कॉफीमुळे शरीराचं तापमान वाढतं. तसेच याने पचन तंत्रही बिघडतं.

लोणचं - लोणच्यामध्ये सोडिअमचं प्रमाण फार जास्त असतं. जे शरीराला डिहायड्रेट करू शकतं. त्यासोबतच उन्हाळ्यात जास्त लोणचे खाल्ल्याने अपचनाची समस्या होऊ शकते. कारण ते उष्ण असतं.

सोडा - उन्हाळ्यात कार्बोनेटेड ड्रिंक्सचं फार सेवन केलं जातं. हे पिण्यात मजाही येते. पण ते अनहेल्दी असतात. सोड्यामध्ये शुगर आणि इतर अनहेल्दी पदार्थ असतात. जे शरीराला डिहायड्रेट करतात. तसेच गोड पेय प्यायल्याने डायबिटीस आणि लठ्ठपणाचा धोकाही असतो.

फक्त ज्यूस पिणे - फळांचा ज्यूस प्यायल्याने मेंदु आणि शरीर फ्रेश राहतं. पण तुम्ही उन्हाळ्यात फक्त ज्यूसचं सेवन करू नये. कारण यात फायबर नसतं. तुम्ही ज्यूससोबत फळांचं आणि भाज्यांचं सेवन करावं. याने पोषक तत्व वाढतात आणि पोटही बराच वेळ भरलेलं राहतं.

मद्यसेवन - मद्यसेवनाचे अनेक साइड इफेक्ट्स असतात. पण तरीही लोक उन्हाळ्यात भरपूर बीअर पितात. उन्हाळ्यात मद्यसेवन केल्यावर डोकेदुखी, तोंड कोरडं पडणे अशी लक्षण दिसतात. त्याशिवाय दारूचं सेवन केल्यावर शरीर गरम राहतं. शरीरात घाम वाढतो. घाम आल्यावर डिहायड्रेशनची समस्या अधिक वाढते.

हेही खाणं टाळा

वर सांगण्यात आलेल्या गोष्टींसोबतच उन्हाळ्यात जास्त मीठ आणि तळलेले पदार्थ, मिल्कशेक, जंक फूड्स, आइसक्रीम, आंबे आणि मांसाचं जास्त सेवन करू नका. 

Web Title: Avoid these 10 foods and drinks in summer you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.