वजन कमी करायचं असेल तर आधी 'हे' पदार्थ खाणं करा बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 09:57 AM2019-11-25T09:57:37+5:302019-11-25T09:58:01+5:30
लठ्ठपणा आणि बाहेर आलेल्या पोटाने हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट प्लॅनसोबतच जमेल त्या सर्व एक्सरसाइज करू लागतात.
(Image Credit : eatthis.com)
लठ्ठपणा आणि बाहेर आलेल्या पोटाने हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट प्लॅनसोबतच जमेल त्या सर्व एक्सरसाइज करू लागतात. काहींना याचा फायदा होतो, पण काहींना होत नाही. वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या हेच अनेकांना माहीत नसतं. म्हणजे अनेकांना हे माहीत असतं की, वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करावीच लागते. पण सोबतच काय खाणं बंद करावं किंवा काय खावं हे अनेकांना माहीत नसतं. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वातआधी कोणते पदार्थ खाणं बंद करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सोयाबीनचं तेल
सोयाबीनच्या तेलामुळे वजन वाढतं. या तेलामध्ये सॅच्युरेडेट फॅट्सचं प्रमाण भरपूर असतं. पण २०१६ मधील एका रिसर्चनुसार, वजन वाढवण्याबाबत सोयाबीनचं तेल ऑइल शुगरपेक्षाही अधिक जबाबदार आहे. असे मानले जाते की, सोयाबीन तेलात ओमेगा-६ अॅसिड्सचं प्रमाणही अधिक असतं. या अॅसिडचं थोडं प्रमाण आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण जास्त प्रमाणात या तेलातील पदार्थांचं सेवन केलं तर वजन वाढतं.
एक्स्ट्रा शुगर आणि क्रीम कॉफी
(Image Credit : cookingwithplants.com)
कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करते. पण यात जर एक्स्ट्रा शुगर आणि कॉफी क्रीम टाकून सेवन करत असाल तर तुमची ही सवय बदला. कारण याने तुमचं वजन वेगाने वाढेल. तेच जर केवळ कॉफीचं योग्य प्रमाणात सेवन कराल तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
ब्रेड
जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी व्हाईट ब्रेड खाणं बंद केलं पाहिजे. कारण हे ब्रेड रिफाइन्ड मैदा आणि शुगरपासून तयार केलेले असतात. या ब्रेडच्या अधिक सेवनामुळे ब्लड शुगरचं प्रमाण वाढू शकतं, सोबतच वजनही वाढू लागतं.
बीअर
अनेक लोकांना असं वाटतं की, मद्यसेवन केल्याने वजन वाढत नाही. पण हा गैरसमज आहे. बीअरचं सेवन अधिक केल्याने वजन वाढतं. कारण यात कॅलरीचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे बीअर पिणे बंद करा.
पॅकेटमधील पदार्थ, बिस्कीट
पॅक केलेले पदार्थ, बिस्किट आणि कुकीजमुळेही वजन वाढतं. तसेच सोडा, कोल्ड ड्रिंक्स आणि इतरही गोड पदार्थांमुळे वजन वाढतं. या पदार्थांच्या अधिक सेवनाने केवळ आरोग्याला धोका नाही तर वजनही वाढतं.