हल्ली तुम्ही फार थकल्यासारखे दिसता.. वय झालं वाटतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:02 PM2017-08-12T17:02:01+5:302017-08-12T17:07:32+5:30

प्रौढत्वाच्या अकाली खुणा चेहºयावर दिसत असतील, तर हे खाणं तुम्ही टाळायलाच हवं..

Avoid these foods.. It can increase your aging process | हल्ली तुम्ही फार थकल्यासारखे दिसता.. वय झालं वाटतं!

हल्ली तुम्ही फार थकल्यासारखे दिसता.. वय झालं वाटतं!

Next
ठळक मुद्देएनर्जी ड्रिंक, तुमची केवळ एनर्जीच नव्हे, वयही वेगानं वाढवतं.वयाची चिन्हं हळू करायची असतील, तर खारट पदार्थ हद्दपार कराप्रोसेस्ड फूड वाढवील तुमचं वय झपाट्यानं.बेकरी प्रॉडक्टसला लांबूनच करा नमस्कार.

- मयूर पठाडे

खरंच सांगा, हल्ली तुम्हाला वाटायलो लागलंय ना, की आपलं वय वाढत चाललंय, आपल्या चेहºयावर सुरकुत्या यायला लागल्यात. आणि हे प्रौढत्वही आपल्याला अकालीच आलेलं आहे, असंही तुम्हाला वाटतंय ना.. खरं तर आपण तेवढे ‘म्हातारे’, प्रौढ नाहीत, पण तरीही आपला चेहरा मात्र आपलं वाढीव वय दाखवतंय.. कशामुळे हे? त्याची मोठी चिंताही तुम्हाला वाटतेय ना..
त्याचं कारण आपल्या खाण्यापिण्यात आहे. भले तुम्ही रोज व्यायाम करताहेत, फिट राहाण्यासाठी कुठला ना कुठला वर्कआऊट करताहेत, पण तुमच्या रोजच्या खाण्यापिण्यांत, आहारात गडबड असेल तर नको त्या वयात, अकालीच तुमच्या चेहºयावर वय वाढीच्या खुणा उमटणारच.
त्यामुळे त्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे यापेक्षा कोणते पदार्थ खाणं आपण टाळलं पाहिजे याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.

वयवाढीच्या खुणा चेहºयावर नको असतील तर टाळा हे पदार्थ
१- अनेकदा आपण हेल्थ ड्रिंकचा वापर करतो. पण हे हेल्थ ड्रिंक्स आपल्या अपेक्षेपेक्षाही खूपच वेगानं म्हणजे अगदी दुपटीनं आपल्याला ‘म्हातारं’ करतात. त्यात असलेली साखर आपल्या दातावर आणि आपल्या त्वचेवरही विपरित परिणाम करते.
२- बेकरी प्रॉडक्ट्स आपल्याला कितीही आवडत असले तरीही तुमच्या चेहºयावरच्या सुरकुत्या ते वाढवील. या पदार्थांतली साखर आणि फॅट्स यामुळे तुमचं वजनही वाढेल आणि दातांचही आरोग्य बिघडवेल.
३- साखर, साखरेचे पदार्थ तर आपल्या संपूर्ण शरीरासाठीच घातक आहेत. गरजेपेक्षा जास्त साखर आपल्या शरीरात जाणं म्हणजे स्वत:हून म्हातारपणाला निमंत्रण देणं. साखर आपल्या त्वचेचीही वाट लावते आणि आपोआपच म्हातारपणाकडे तुमची वाटचाल सुरू होते.
४- ओट्स, पास्ता यासारखे पदार्थ हळूहळू तुम्हाला वृद्धत्वाकडे घेऊन जातात. तुमची त्वचा तर निस्तेज होतेच, पण वयवाढीची प्रक्रियाही त्यामुळे गतिमान होते.
५- अल्कोहोल, म्हणजे दारूचं व्यसन जर तुम्हाला असेल तर मग संपलंच. क्वचित कधी तरी अधूनमधून काही घुटके तुम्ही घेत असाल, तर ठीक आहे, पण त्याचं प्रमाण जर वाढलं, तर तुमच्या झटपट आणि अकाली म्हातारपणाला कोणीही पकडून ठेऊ शकणार नाही.
६- ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ आहे असे पदार्थही आवर्जून टाळायला हवेत.
७- प्रोसेस्ड फूडशिवाय आज आपल्या स्वयंपाकघरातलं पान हलत नाही. पण असे पदार्थ शक्यतो टाळायलाच हवेत.
८- कॉफी अनेकांना आवडते. चहाला पर्याय म्हणूनही अनेक जण कॉफी पितात, पण त्याचं प्रमाण जर वाढलं, तर रोजचा दिवस तुम्हाला जास्त वेगानं वार्धक्याकडे ढकलतोय, हे लक्षात ठेवा..

Web Title: Avoid these foods.. It can increase your aging process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.