पावसाळ्यात वाफाळलेला चहा पिणं सगळयांना आवडतं, पण या ५ चुका कराल तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 09:45 AM2024-07-05T09:45:35+5:302024-07-05T09:46:20+5:30

Monsoon Health Tips: चहा इतका महत्वाचं असूनही चहा चुकीच्या पद्धतीने बनवला आणि त्याचं सेवन केलं तर आरोग्याचं नुकसान होतं.

Avoid these mistake while having tea during rainy season | पावसाळ्यात वाफाळलेला चहा पिणं सगळयांना आवडतं, पण या ५ चुका कराल तर पडेल महागात!

पावसाळ्यात वाफाळलेला चहा पिणं सगळयांना आवडतं, पण या ५ चुका कराल तर पडेल महागात!

Monsoon Health Tips: मानसून एक असा मजेदार ऋतू आहे ज्यात लोक भरभरून चहाचा आनंद घेतात. पावसाच्या रिमझिम धारा आणि वाफाळलेला चहा हे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडतं. इतकंच नाही तर आल्याचा चहा घेतल्याने या दिवसात सर्दी-खोकला कमी होण्यासही मदत मिळते. पण चहा इतका महत्वाचं असूनही चहा चुकीच्या पद्धतीने बनवला आणि त्याचं सेवन केलं तर आरोग्याचं नुकसान होतं. चहा सेवन करताना किंवा बनवताना काय करू नये हे आज जाणून घेऊ.

रिकाम्या पोटी चहाचं सेवन

बरेच लोक झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटीच चहाचं सेवन करतात. ही सवय तुमच्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकते. असं केल्याने ब्लोटिंग, गॅस, अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. कधी कधी आंबट ढेकरही येऊ शकते. छातीत जळजळ होते. 

चहामध्ये जास्त मसाले

लवंग, वेलची, आले आणि दालचीनी यामुळे नक्कीच चहाची टेस्ट वाढते. पण हेही लक्षात ठेवा की, हे मसाले गरम असतात. त्यामुळे यांच्या जास्त सेवनाने वात, पित्त आणि कफाची समस्या होऊ शकते. पावसाळ्यात यांचा जास्त वापर कमी प्रमाणात करा.

जास्त वेळ चहा उकडणे

या दिवसात सगळ्यांनाच कडक चहा हवा असतो. पण चहा जास्त वेळ उकडल्याने आरोग्याचं मोठं नुकसान होतं. याने पचन तंत्र बिघडतं, सोबतच जास्त उकडल्याने कॅफीनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे ही चूक टाळा.

जास्त चहा पिऊ नका

पावसांच्या सरींसोबत गरमागरम चहा सगळ्यांना हवाहवा वाटतो. पण चहाच्या जास्त सेवनामुळे नुकसानच होतं. जास्त चहा घेतल्याने शरीरात आयर्नला अवशोषण करण्याची क्षमता घटते, जे चहातील टॅनिनमुळे होतं. त्यामुळे काळजी घ्या की, दिवसातून एक किंवा दोन कपांपेक्षा जास्त चहा चांगली बाब नाही.

जेवण केल्यावर चहा

अनेक लोकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची चुकीची सवय असते. जर तुम्हीही या दिवसात दोन कपांपेक्षा जास्त चहा पित असाल तर हे आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. यामुळे पचनासंबंधी समस्या वाढतात आणि शरीरात आयर्न व प्रोटीनच्या अवशोषणात अडथळा येतो.

Web Title: Avoid these mistake while having tea during rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.