नाश्त्यात चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 05:36 PM2022-08-31T17:36:39+5:302022-08-31T17:38:05+5:30

Avoid Morning Breakfast: एक्सपर्ट सांगतात की, सकाळचा नाश्ता हा पोट भरण्यासाठी नाहीये. काही लोक सकाळी सकाळी  पोट भरण्यावर भर देतात. अशा लोकांना दिवसभर सुस्ती, कमजोरी जाणवते.

Avoid this foods in the morning breakfast which is unhealthy for your health | नाश्त्यात चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

नाश्त्यात चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

Next

Avoid Morning Breakfast: सकाळचा नाश्ता हा दिवसभर आपल्याला ऊर्जा देतो. जास्तीत जास्त लोक नाश्त्यात पोषक पदार्थ खाण्यावर जोर देतात. पण बरेच लोक नाश्त्यात पोषक तत्व असलेले पदार्थ खाण्याऐवजी पॅकेज्ड फूडचा पर्याय निवडतात. जे चुकीचं आहे. याने आरोग्य बिघडतं सोबतच शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवरही याचा वाईट परिणाम होतो. 

एक्सपर्ट सांगतात की, सकाळचा नाश्ता हा पोट भरण्यासाठी नाहीये. काही लोक सकाळी सकाळी  पोट भरण्यावर भर देतात. अशा लोकांना दिवसभर सुस्ती, कमजोरी जाणवते. त्यामुळे डॉक्टर नाश्त्यात अशा पदार्थांचा समावेश करण्यास सांगतात ज्यातून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतील आणि दिवसभर तुम्हाला एनर्जी मिळेल. अशात नाश्त्यात काय खाऊ नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पांढरे ब्रेड

बरेच लोक दिवसाची सुरूवात पांढरे ब्रेड आणि चहाने करतात. जास्तीत जास्त लोकांचा चहा ब्रेड हा फेवरेट नाश्ता आहे. पण हा नाश्ता आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. ब्रेडमध्ये पोषक तत्व अजिबात नसतात आणि जेव्हा आपण त्यावर सॉस लावून खातो तेव्हा याने पचन तंत्रावर परिणाम होतो. त्यामुळे पांढऱ्या ब्रेडऐवजी दुसरा काही पर्याय निवडावा.

फ्लेवर्ड दही

अनेक लोक नाश्ता करताना फ्लेवर्ड दही खातात. हे ते रोजच करतात, पण असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. फ्लेवर्ड दही गोड जास्त असतं. त्यामुळे समस्या होऊ शकते. 

पॅकेज्ड फूड

आजकाल लोक वेळ वाचवण्याच्या नादात पॅकेज्ड फूडचं सेवन जास्त करतात. आता हे पदार्थ नाश्त्यातही खाल्ले जातात. नाश्त्यात हे पदार्थ अजिबात खाऊ नये. या पदार्थांमध्ये कमी एनर्जी, फॅट कार्ब्स असतं. ज्यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस अशा समस्या होऊ शकतात.

स्मूदी

स्मूदी आरोग्यासाठी चांगली असते. पण ती प्रोटीनयुक्त पदार्थांपासून तयार केलेली असावी. जसे की, ओट्स आणि प्रोटीन, प्रोटीन आणि केळी, पपईची स्मूदी इत्यादी. जास्तीत जास्त स्मूदी तयार करण्याचे पर्याय फळांपासून मिळतात. ज्यामुळे शुगरचं प्रमाण वाढू शकतं. तसेच तुमचं ब्लड प्रेशरही याने वाढू शकतं.

Web Title: Avoid this foods in the morning breakfast which is unhealthy for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.