आंघोळ करताना 'या' चुका टाळा, अन्यथा गंभीर दुष्परिणामांमुळे पस्तावण्याची वेळ येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:01 PM2022-01-31T18:01:07+5:302022-01-31T18:04:03+5:30
आंघोळ करताना आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्याचे दुष्परिणाम होऊ (Mistakes made while bathing) शकतात.
अंघोळ करताना (bathing) नकळतपणे काही चुका आपल्या हातून केल्या जातात. त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळं तुमच्या त्वचेलाच नाही तर, केसांनाही मोठं नुकसान होऊ शकतं. साबण आणि शाम्पूमध्ये रासायनिक पदार्थ असतात. आंघोळ करताना आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्याचे दुष्परिणाम होऊ (Mistakes made while bathing) शकतात.
आज तकने दिलेल्या बातमीनुसार, मेडिसिन डायरेक्टचे सुपरिटेंडेंट फार्मासिस्ट हुसेन अब्देह यांनी यापैकी काही चुकांचा अभ्यास केला आहे. बहुतेक साबण किंवा शाम्पू बराच वेळ लावल्यानंतर त्वचा कोरडी होऊ लागते, असं त्यांचं म्हणणं आहे. साबण किंवा शाम्पू वापरल्यानंतर पाण्यानं शरीर आणि केस व्यवस्थित धुणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, त्वचेला तडे जाऊ शकतात.
याशिवाय, तज्ज्ञांनी शॉवरखाली बराच वेळ उभं न राहण्याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले की, बराच वेळ आंघोळ केल्यानंतरही त्वचा कोरडी होते. याशिवाय, त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो आणि ती संवेदनशील होऊ शकते. तज्ज्ञांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शॉवर घेणं अयोग्य मानलं आहे.
हार्वर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, शाम्पू, कंडिशनर आणि साबणांमध्ये असलेलं तेल, परफ्यूम आणि इतर घटकांचेही तोटे आहेत. हे सर्व पदार्थ अॅलर्जीही निर्माण करू शकतात. वेळच्या वेळी अंघोळ करणं आणि अंघोळीचा कालावधी असे दोन्ही महत्त्वाचे आहेत, असं आरोग्य संस्थेनं सूचित केलंय. तथापि, दोन अंघोळींदरम्यान किती कालावधी असावा, याचा आदर्श त्यांनी सेट केलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ अंघोळ केल्यानं त्वचेला तडे जाऊ शकतात; ज्यामुळं, बॅक्टेरिया किंवा अॅलर्जी निर्माण करणारे घटक त्वचेत सहज प्रवेश करू शकतात. अँटीबॅक्टेरियल साबण त्वचेवर असलेले आणि आपल्याला आवश्यक असलेले सामान्य जीवाणू देखील नष्ट करतो. यामुळं त्वचेवरील सूक्ष्मजंतूंचं संतुलन बिघडतं. यामुळं प्रतिजैविकांना (अँटीबायोटिक्स) रोखून अधिक ताकद असलेल्या सूक्ष्मजंतूंना त्वचेवर वाढू लागण्यास अनुकूलता मिळते. यामुळं आपल्याला आजारांना सामोरं जावं लागतं.
याव्यतिरिक्त, आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीला सामान्य सूक्ष्मजीव, अस्वच्छता आणि इतर पर्यावरणीय प्रदर्शनांद्वारे संरक्षणात्मक प्रतिपिंड आणि रोगप्रतिकारक स्मरणशक्तीसाठी विशिष्ट प्रमाणात उत्तेजनाची आवश्यकता असते. याशिवाय, ज्या पाण्यानं आपण आपलं शरीर स्वच्छ करतो त्यात क्षार, जड धातू, क्लोरीन, फ्लोराईड, कीटकनाशके आणि सर्व प्रकारची रसायने असतात. पाण्यात असलेले हे घटकदेखील समस्या निर्माण करू शकतात.