श्वसनाचे आजार, आयुर्वेदाचा आधार; वेळीच करा हे खात्रीशीर उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 06:47 PM2022-01-11T18:47:50+5:302022-01-12T14:41:48+5:30

वायु प्रदूषणामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. आरोग्याची काळजी आणि इम्युनिटीसाठी वेळीच योग्य उपाय योजले पाहिजेत. त्यासाठी आयुर्वेद उत्तम पर्याय ठरू शकतो.

ayurveda to cure respiratory diseases; Kofol Immunity tablets and syrup | श्वसनाचे आजार, आयुर्वेदाचा आधार; वेळीच करा हे खात्रीशीर उपाय!

श्वसनाचे आजार, आयुर्वेदाचा आधार; वेळीच करा हे खात्रीशीर उपाय!

googlenewsNext

गेल्या काही वर्षांपासून प्रदूषण आणि त्याचे गंभीर परिणाम, या विषयावर सातत्याने चर्चा होत आहे. जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषणाच्या तुलनेत वायुप्रदूषण अधिक चिंताजनक आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगातील अनेक देश वायुप्रदूषणाचे दुष्परिणाम भोगत आहेत. श्वसनाशी संबंधित अनेक आजारांना वायुप्रदूषण कारणीभूत ठरतंय आणि म्हणूनच ते जीवघेणं मानलं जातंय. सर्वाधिक वायुप्रदूषण असलेल्या जगातील दहा देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे, ही नक्कीच काळजीची गोष्ट आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात वाहतूक, उद्योगांसह सगळेच व्यवहार बंद असल्यानं प्रदूषणाची पातळी एकदमच खाली आल्याचं आपण पाहिलं. मात्र, आता पुन्हा ते उच्चांकी पातळीवर पोहोचताना दिसतंय.

भारतात वायुप्रदूषणाला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. गाड्यांच्या धुरामुळे, भाताच्या शेतातील तण जाळल्याने, कोळशावर चालणाऱ्या पावरप्लांटमधून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होतं. वाहनांची संख्या तर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात वायुप्रदूषण ही भारतातील सर्वात मोठी समस्या बनू शकते. दिल्लीत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. डम्पिंग ग्राउंडवरील आगीमुळेही मोठं वायुप्रदूषण होतं. त्यामुळे भारत वायुप्रदूषणाबाबत जगात कधी पहिल्या क्रमांकावर येईल, हे सांगता येत नाही. 

वायुप्रदूषणामुळे लंग्स कन्सर, क्रॉनिक लंग्स डिसीजसह इतरही काही श्वसनाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. वायु प्रदूषणामुळे केसगळतीसारख्या समस्येचा सामना जगभरातील लोकांना करावा लागत आहे. 

गंभीर आजारांसोबतच खोकला, घशात खवखव, मळमळ, डोळ्यांची जळजळ हे त्रासही सातत्याने वाढत आहेत. श्वसनासंबंधी समस्या जास्त प्रमाणात भेडसावत आहेत. त्याची परिणती अस्थमा अटॅकसारख्या गंभीर आजारातही होऊ शकते. या सगळ्याचे प्रमुख कारण वायुप्रदूषण आहे. केवळ मोठ्या व्यक्तींसाठीच नाही, तर लहान मुलं, नवजात बालकांसाठीही वायुप्रदूषण घातक ठरू शकतं. त्यांची त्वचा नाजूक असते आणि वायुप्रदूषण त्वचाविकारांनाही आमंत्रण देतं. 

सर्वात काळजीची आणि धक्कादायक बाब म्हणजे वायु प्रदूषणामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्तीचं महत्व कोरोना काळात आपण सर्वांनीच जाणलं आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी आणि इम्युनिटीसाठी वेळीच योग्य उपाय योजले पाहिजेत. त्यासाठी आयुर्वेद उत्तम पर्याय ठरू शकतो.

वायुप्रदूषणाशी लढण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

- संतुलित आहार घ्या, ज्यात पौष्टिक ड्रायफ्रूट्सचा समावेश करा. उदाः बदाम आणि अक्रोड. याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तत्त्वं शरीरात वाढतील. 

- तुमच्या शरीरानुसार आणि शरीराला सहन होईल तेवढाच व्यायाम करा. योगाभ्यास हाही एक चांगला पर्याय आहे.

- दररोज प्राणायाम कराल तर श्वसनविकार दूर राहतील.

- उष्ण पेय घेतल्यास शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. तसेच सर्दी आणि अ‍ॅलर्जीपासून सुटका मिळते. हिवाळ्यात दुधात हळद घालून प्यायल्यास श्वसनक्रिया चांगली राहते. महत्त्वाची बाब म्हणजे याचा फायदा मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही होतो. 

- तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक सप्लिमेंट्सही घेऊ शकता. जसे की, Kofol Immunity Tablets. या चरक फार्माने बनवलेल्या असून रोगप्रतिकारक्षमता वाढवण्याची त्यांची क्षमता वैद्यकीय संशोधनाने सिद्ध झाली आहे. याने श्वसन आरोग्यही चांगलं राहतं.

- या टॅबलेटमुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांची इम्यूनिटीही बूस्ट होते. आजार पसरवणाऱ्या बॅक्टेरियासोबत लढणारी तत्त्वं शरीरात वाढतात. गुळवेल, तुळशी, चित्रक, सुंठ, पिंपळी आणि मंजिष्ठा यामुळे केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढते असं नाही, तर श्वसनासंबंधी आरोग्यही चांगलं होतं. 

- तुम्हाला जर सतत खोकल्याची समस्या होत असेल तर तुम्ही Kofol Syrup वापरू शकता. मोठ्यांसोबत लहान मुलांचीही खोकल्याची समस्या याने लगेच दूर होते. शिवाय याचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत. या औषधात जेष्ठमध, सुंठ, बेहडा, हळद आणि इतर औषधी वनस्पतींचा समावेश केला आहे, ज्याने संक्रमणासोबत लढण्याची तुमची शक्ती वाढते.

चरक फार्माबद्दल...

चरक फार्मा ही भारतातील आयुर्वेदिक औषधे तयारी करणारी प्रसिद्ध आणि प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी १९४७ पासून भारतात कार्यरत आहे व वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने तयार करते. आरोग्याशी संबंधित प्रॉडक्ट असल्यानं दर्जामध्ये कुठलीही तडजोड न करता, ग्राहकांना उत्तम प्रतीचं औषध उपलब्ध करणं, हा कंपनीचा प्रामाणिक उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चरक फार्माने आंतरराष्ट्रीय हर्बल हेल्थकेअर कंपनी म्हणूनही ओळख निर्माण निर्माण केली आहे.

Web Title: ayurveda to cure respiratory diseases; Kofol Immunity tablets and syrup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.