सैंधव मीठ खाल्ल्याने अनेक समस्या होता दूर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले कितीतरी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:19 PM2024-06-20T15:19:47+5:302024-06-20T15:21:32+5:30

Rock salt benefits: सैंधव मिठाला आयुर्वेदात खूप महत्वं आहे. त्याची कारणेही वेगवेगळी आहेत. जी लोकांना माहीत नसतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Ayurveda doctor Aishwarya Santosh tells benefits and Uses of Sendha Namak or Rock Salt | सैंधव मीठ खाल्ल्याने अनेक समस्या होता दूर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले कितीतरी फायदे!

सैंधव मीठ खाल्ल्याने अनेक समस्या होता दूर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले कितीतरी फायदे!

Rock salt benefits: मीठ आपल्या रोजच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. मिठातून आपल्या शरीराला सोडिअम मिळतं. पण जास्त मीठ खाणंही नुकसानकारक असतं. मिठाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पांढरं मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ, काळं मीठ असे वेगवेगळे मीठ मिळतात. पण सैंधव मिठाला आयुर्वेदात खूप महत्वं आहे. त्याची कारणेही वेगवेगळी आहेत. जी लोकांना माहीत नसतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांच्यानुसार, सैंधव मिठाचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याच्या रोजच्या सेवनाने शरीरात तीन दोष जसे की, वात, कफ आणि पित्त संतुलित राहतात. हे एकमेव असं मीठ आहे  ज्याने हार्ट आणि डोळ्यांसंबंधी आजार होत नाही.

किती प्रमाणात करावं मिठाचं सेवन?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO नुसार, एका वयस्क व्यक्तीने रोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मिठाचं सेवन करावं. त्यासोबतच असंही मानलं जातं की, जेवणात वरून मीठ घेतल्याने शरीरात अनेक आजार तयार होतात.

सैंधव मीठ फायदेशीर

आयुर्वेदीक एक्सपर्टने सांगितलं की, सैंधव मिठाचा वापर करून शरीर अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्त राहू शकतं. याने पचनात सुधारणा, पोटातील सुजेची समस्या करण्यात मदत मिळते. याने थंडावा आणि उर्जाही मिळते.

हार्ट ठेवतं निरोगी

आयुर्वेद एक्सपर्टनी सांगितलं की, सैंधव मीठ हार्टला निरोगी करण्याचं काम करतं. शिजलेल्या अन्नात अधिक प्रमाणात सोडिअम असतं. ज्याने हार्टसंबंधी समस्या जसे की, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशा सैंधव मिठाचा वापर करणं फायदेशीर असतं.

डोळ्यांसाठी फायदेशीर

आयुर्वेद एक्सपर्टने सांगितलं की, सैंधव मीठ हे असं एकमेव मीठ आहे जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. रोज याचा आपल्या आहारात समावेश केल्याने डोळ्यांचा अनेक प्रकारच्या संक्रमणापासून आणि आजारांपासून बचाव होऊ शकतो.

जास्त मीठ खाण्याचे नुकसान

- हार्ट फेल 

-हाय बीपी

- किडनी रोग

- ऑस्टियोपोरोसिस

- पोटाचा कॅन्सर

- हार्ट स्ट्रोक

Web Title: Ayurveda doctor Aishwarya Santosh tells benefits and Uses of Sendha Namak or Rock Salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.