जेवण केल्यावर आंघोळ करता का? आयुर्वेद डॉक्टरांनी दिला हे गंभीर आजार होण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 12:25 PM2022-06-25T12:25:06+5:302022-06-25T12:28:01+5:30

Bath after meal : तुम्ही अनेकदा घरातील वृद्धांकडून ऐकलं असेल की, रात्री उशीरापर्यंत जागू नये, रिकाम्या पोटी झोपू नये, सकाळी आंघोळ करूनच जेवण करावं.

Ayurveda doctor answers is it good idea to take bath after meal or not know the consequences | जेवण केल्यावर आंघोळ करता का? आयुर्वेद डॉक्टरांनी दिला हे गंभीर आजार होण्याचा इशारा

जेवण केल्यावर आंघोळ करता का? आयुर्वेद डॉक्टरांनी दिला हे गंभीर आजार होण्याचा इशारा

googlenewsNext

Bath after meal : आयुर्वेदात मनुष्याच्या निरोगी जीवनाबाबत आणि प्रसन्न राहण्यासाठी काही नियम दिले आहेत. जे फॉलो करून व्यक्ती निरोगी आणि ऊर्जावान होऊन आपलं जीवन जगू शकतात. घरातील वयोवृद्ध लोकांना हे जास्त माहीत असतं. तुम्ही अनेकदा घरातील वृद्धांकडून ऐकलं असेल की, रात्री उशीरापर्यंत जागू नये, रिकाम्या पोटी झोपू नये, सकाळी आंघोळ करूनच जेवण करावं. जर तुम्ही याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल तर तुम्ही मोठी चूक करत आहात.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी जेवणानंतर आंघोळ करण्याची सवय चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं की, जेवण केल्यानंतर आंघोळ करणं ही चुकीच्या क्रियांपैकी एक आहे. आयुर्वेदात यामुळे संधीवात किंवा त्वचा रोग होण्याचं मुख्य कारण म्हटलं आहे.

जेवणानंतर शरीराचं तापमान वाढतं

तज्ज्ञांनी सांगितलं की, रिसर्चनुसार जेवण केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान 2 डिग्रीपर्यंत वाढतं. याने जेवण पचवण्यात मदत होते. जेव्हा पोटात पचनक्रिया सुरू असते तेव्हा ब्लड फ्लो सुद्धा वेगाने होत असतो.

जेवणानंतर आंघोळीबाबत काय सांगत आयर्वेद

तज्ज्ञांनी सांगितलं की, आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया हळुवार होते. ज्यामुळे अन्नातील पोषक तत्व शरीराला प्रभावीपणे मिळत नाहीत. शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, संधीवातापासून ते त्वचासंबंधी रोग.

आंघोळीनंतर जेवण चांगलं

तज्ज्ञ सांगतात की, आयुर्वेदानुसार, जेवणाआधी आंघोळ केल्याने तुम्ही निरोगी रहाल. तसेच तुम्ही पोटभर आरामात जेवणही करू शकता.
डॉ. अपर्णा यांनी सांगितलं की, हेवी मीलनंतर जवळपास 2 ते 3 तासांपर्यंत आंघोळ करू नये. तर ब्रेकफास्टनंतर 1 तासापर्यंत आंघोळ न केल्यानेही तुमचं आरोग्य चांगलं राहतं.

Web Title: Ayurveda doctor answers is it good idea to take bath after meal or not know the consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.