आयुर्वेद डॉक्टरांचा दावा - 40 दिवसात डोळ्यांचा चष्मा होईल दूर, जाणून घ्या कसा कराल उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 04:31 PM2024-10-19T16:31:36+5:302024-10-19T16:32:48+5:30
शरीराला पोषण कमी मिळत असल्याने नजर कमजोर होत असेल तर ही समस्या घरगुती उपायांनी दूर केली जाऊ शकते. याबाबतचे काही उपाय सांगणारा व्हिडीओ डॉ. निशांत गुप्ता यांनी इन्स्टावर शेअर केला आहे.
वयानुसार नजर कमजोर होणे ही एक फारच कॉमन समस्या आहे. मात्र,आजकाल कमी वयातही ही समस्या अनेकांना होत आहे. लहान मुले, तरूणांनाही आजकाल जवळचं किंवा दूरचं दिसत नाही म्हणून चष्मा लागलेला असतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही आयुर्वेदीक उपाय करूनही कमजोर नजरेची समस्या दूर करता येऊ शकते. जर शरीराला पोषण कमी मिळत असल्याने नजर कमजोर होत असेल तर ही समस्या घरगुती उपायांनी दूर केली जाऊ शकते. याबाबतचे काही उपाय सांगणारा व्हिडीओ डॉ. निशांत गुप्ता यांनी इन्स्टावर शेअर केला आहे.
डॉ. गुप्ता यांनी सांगिलेले हे उपाय तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यांच्यानुसार, डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी आयुर्वेद एक योग्य उपाय आहे. इतकंच नाही तर डॉक्टरांनी दावा केला की, त्यांच्या या घरगुती उपायाचा प्रभाव 40 दिवसात दिसू लागेल.
4 गोष्टी मिळून बनवा उपाय
बारीक केलेले 100 ग्रॅम बदाम
50 ग्रॅम बडीशेप
25 ग्रॅम काळी मिरे
25 ग्रॅम खडीसाखर
या चारही गोष्टी मिक्स करून बारीक करा. या पावडरचं अर्धा अर्धा चमका सकाळी आणि सायंकाळी दुधासोबत सेवन करा.
रात्री अर्ध्या अर्ध्या तासाने करा त्रिफळाचं सेवन
रात्री पहिला उपाय केल्यानंतर अर्ध्या तासांनंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे. यात थोडा त्रिफळा पावडर घ्या आणि थोडं मध मिक्स करून चाटण तयार करा. यानेही नजर मजबूत होण्यास मदत मिळेल.
डोळ्यांच्या काळजीसाठी काय कराल?
डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी नियमितपणे नारंगी आणि लाल रंगाच्या फळांचं सेवन करा. तसेच रोज हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा. मासे खा. तसेच स्मोकिंग बंद करा आणि बाहेर जाताना सनग्लासेसचा वापर करा.