सकाळी की रात्री? आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती, एक्सपर्टने सांगितला आयुर्वेदातील नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 04:20 PM2022-06-18T16:20:20+5:302022-06-18T16:22:57+5:30
Bathing Tips : आयुर्वेदात आंघोळ करण्याची योग्य वेळ सकाळची सांगण्यात आली आहे आणि याचं सर्वात मोठं कारण हे आहे की, तुम्हाला अनेक रोगांपासून वाचण्यास मदत मिळते. सोबतच तुम्ही दिवसभर ताजेतवाणे राहतात.
Bathing Tips : रोज आंघोळ करणं चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. आंघोळ केल्याने अनेक रोगांपासून बचाव होतो, सोबतच तुम्हाला फ्रेशही वाटतं. तसे तर जास्तीत जास्त लोक सकाळी आंघोळ करतात. पण पण काही लोक असेही आहेत जे रात्री झोपण्यापूर्वीही, ऑफिसमधून आल्यावर किंवा सकाळी नाश्ता केल्यावर आंघोळ करतात. जर तुम्हीही असंच करत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात.
आयुर्वेदात आंघोळ करण्याची योग्य वेळ सकाळची सांगण्यात आली आहे आणि याचं सर्वात मोठं कारण हे आहे की, तुम्हाला अनेक रोगांपासून वाचण्यास मदत मिळते. सोबतच तुम्ही दिवसभर ताजेतवाणे राहतात. सकाळी आंघोळ करण्याचे अनेक लाभही आहेत.
नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल इन्फॉर्मेशमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, आंघोळ केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. रोज आंघोळ करणाऱ्या लोकांमध्ये वेदना, तणाव आणि डिप्रेशनसारखी लक्षणं अनियमित रूपाने आंघोळ करणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी असतात.
आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी आंघोळीच्या वेळासंबंधी माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं की, आंघोळ आयुर्वेदात थेरेपेटिक अॅक्टिविटी आहे जी तन, मन आणि आत्मा फ्रेश ठेवण्याचं काम करते.
आयुर्वेदात आंघोळीला स्नान म्हणतात. यानुसार स्नाम एका चिकित्सीय क्रिया आहे. जर ही क्रिया योग्यप्रकारे केली तर शरीर, मन आणि आत्म्याला सुरक्षा मिळते आणि फ्रेशही वाटतं.
आंघोळीची योग्य वेळ
डॉक्टर ऐश्वर्या सांगतात की, आयुर्वेदात आचार्यांनी सांगितलं की, पहाटे 4 ते 5 वाजता आंघोळ करणं जास्त फायदेशीर असतं. आपल्या रोजच्या रूटीनमध्ये आंघोळ व्यायाम केल्यानंतर काही वेळाने केली पाहिजे. व्यायामानंतर शरीर थकतं, अशात आंघोळ करणं आरामदायी असतं. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्त होण्यापूर्वी आंघोळ करणं चांगलं मानलं जातं.
रोज आंघोळ करण्याचे फायदे
- हृदयरोगाचा धोका कमी राहतो.
- श्वसन तंत्र मजबूत राहतं.
- हार्मोन्स संतुलित राहतात.
- त्वचेसाठी फायदेशीर असतं.
- ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका कमी राहतो.
- शरीराचं तापमान नियंत्रित राहतं.
जेवण केल्यावर आंघोळ करणं चुकीचं
जेवण केल्यानंतर कधीच आंघोळ करू नये. जेव्हा तुम्ही जेवण केल्यावर लगेच आंघोळ करत असाल पचन अग्नि जी तुम्ही खाल्लेलं अन्न पचन करण्यास मदत कते. त्यात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटासंबंधी अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.
कधी आंघोळ करू नये
शारीरिक मेहनतीनंतर किंवा तापत्या उन्हात आंघोळ केल्याने अनेक आजारांचा धोका राहतो. असं केल्याने मांसपेशींना कव्हर करणाऱ्या कोशिकांमध्ये सूज येते. ज्याला मायोसायटिस म्हणतात. याने मानेत वेदना, पाठीच्या खालच्या भागात वेदना आणि गुडघ्यात वेदना इत्यादी समस्या होऊ लागतात.
रात्री आंघोळ करण्यात करू नये चूक
आयुर्वेदात राक्षी रात्री आंघोळ करणं चुकीचं मानलं जातं. खासकरून लांब आणि दाट केस असलेल्या लोकांना रात्री आंघोळ करणं त्रासाचं कारण ठरू शकतं. रात्री आंघोळ केल्याने केस सुकत नाहीत आणि मायोसायटिस नावाच्या आजाराचा धोकाही निर्माण होतो.