आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं 'या' तीन भाज्यांचं नियमित करा सेवन, पोटातील विषारी पदार्थ येतील बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:02 PM2024-08-09T12:02:28+5:302024-08-09T12:24:57+5:30
Body Detox Vegetable : शरीरात हवा आणि खाण्या-पिण्याच्या माध्यमातून अनेक विषारी पदार्थ जमा होतात. तशा तर आपल्या किडनी शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढतात. पण तरीही अनेक अपशिष्ट पदार्थ आतड्यांमध्ये चिकटून राहतात.
Body Detox Vegetable : शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. जास्तीत जास्त लोक शरीराची बाहेरील स्वच्छता करण्यावर अधिक भर देतात. आपला चेहरा कसा दिसतो, आपले केस कसे दिसतात, त्वचा कशी आहे याबाबत सगळेच काळजी करत असतात. पण जास्तीत जास्त लोक शरीराची आतून स्वच्छता करण्याकडे फार दुर्लक्ष करतात. शरीराची आतून स्वच्छता केली नाही तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात हवा आणि खाण्या-पिण्याच्या माध्यमातून अनेक विषारी पदार्थ जमा होतात. तशा तर आपल्या किडनी शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढतात. पण तरीही अनेक अपशिष्ट पदार्थ आतड्यांमध्ये चिकटून राहतात.
आतड्यांमध्ये जमा झालेले हा विषारी पदार्थ बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. तुम्ही हे नेहमीच ऐकलं असेल की, अनेक आजारांचं मूळ हे पोटात असतं. म्हणजे पोटापासूनच अनेक आजार सुरू होतात. पोट साफ नसल्याने अनेक गंभीर आजार होतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, भूक कमी लागणे, पाइल्स, अॅसिडिटी, वजन कमी होणे, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार अशा समस्या होतात.
आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी अनेक भाज्यांची मदत मिळते. अशात आयुर्वेदिक डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, पोटातील आतड्यांमध्ये जमा असलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तीन भाज्या फार महत्वाच्या ठरतात. चला जाणून घेऊ त्या भाज्यांबाबत...
पांढरा भोपळा
पांढरा भोपळा ही फार पौष्टिक आणि चविष्ट भाजी असते. ही भोपळ्याच्या प्रजातींमधील एक प्रजाती आहे. हिवाळ्यात ही भाजी भरपूर मिळते. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.
पांढरा भोपळा सेवन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी याचा ज्यूस प्यावा. याने आतड्या आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा वाढते. वात आणि पित्त दोषही यामुळे कमी होतो.
शेवग्याच्या शेंगा
आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना शिग्रु म्हणतात. यात कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि इतरही आरोग्यासाठी फायदेशीर तत्व असतात. याच्या सेवनाने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सूप, ज्यूस किंवा भाजी खाऊ शकता. याने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतील.
आतड्यांची स्वच्छता करेल आलं
कफ आणि वात दोष दूर करण्यासाठी आलं सगळ्यात चांगलं मानलं जातं. तसेच याने बद्धकोष्ठताही दूर होते. जुनी श्वास घेण्याची समस्या, अस्थमा, लठ्ठपणा, आतड्यांची स्वच्छता यात हे फार फायदेशीर असतं.
पोट आणि आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही सगळ्या भाज्यांमध्ये एक आल्याचा तुकडा बारीक करून टाकू शकता. डॉक्टरांनी सांगितलं की, हे केल्यावर तुम्हाला 10 दिवसात फरक दिसून येईल.