१०० आजारांवर रामबाण उपाय ठरतात 'ही' पानं, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली खाण्याची पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:08 PM2024-09-04T12:08:43+5:302024-09-04T12:14:16+5:30

Ayurvedic Upay : जर तुमचं शरीर एखाद्या गंभीर आजाराचं शिकार झालं असेल किंवा एखाद्या जुन्या आजाराने तुम्ही ग्रस्त असाल तर औषधांऐवजी एका आयुर्वेदिक उपायाने तुम्ही या समस्या दूर करू शकता.

Ayurveda doctor tells eating curd and tulsi leaf together prevent 100 diseases | १०० आजारांवर रामबाण उपाय ठरतात 'ही' पानं, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली खाण्याची पद्धत...

१०० आजारांवर रामबाण उपाय ठरतात 'ही' पानं, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली खाण्याची पद्धत...

Ayurvedic Upay : अनेक लोक नेहमीच आजारी पडतात, काही लोकांना नेहमीच थकवा जाणवतो आणि कमजोरी जाणवते. याचा अर्थ एकतर तुमची इम्यूनिटी कमजोर झाली असेल, तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल किंवा तुम्हाला एखादा आजार झाला असेल असा असू शकतो. यावर एक आयुर्वेदिक उपाय आहे. जो वर्षानुवर्षे वापरला जात आहे. 

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, सुस्त लाइफस्टाईलमुळे डायबिटीस, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, पोटदुखी, आतड्या खराब होणे, मांसपेशींमध्ये वेदना, हाडं कमजोर होणे, रक्त कमी होणे, त्वचा रोग, थायरॉईडसारखे अनेक गंभीर आजार वेगाने वाढत आहेत. 

जर तुमचं शरीर एखाद्या गंभीर आजाराचं शिकार झालं असेल किंवा एखाद्या जुन्या आजाराने तुम्ही ग्रस्त असाल तर औषधांऐवजी एका आयुर्वेदिक उपायाने तुम्ही या समस्या दूर करू शकता. आयुर्वेद डॉक्टर दीपक कुमार यांनी एक असा उपाय सांगितला आहे जो १०० आजारांना मुळापासून दूर करण्यास मदत करतो.

अनेक आजारांवर रामबाण उपाय तुळशीची पाने

तुळशीला आयुर्वेदात फार महत्व आहे. या झाडाचा वापर फार आधीपासून अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. तुळशीच्या झाडामध्ये अनेक औषधी गुण असतात. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबिअल आणि इम्यूनोमॉड्यूलेटरसारखे गुण असतात. याच्या वापराने डायबिटीस, कॅन्सर, सर्दी-खोकला, हृदयरोग आणि पचनासंबंधी समस्या दूर करता येतात. या पानांचं सेवन कसं करावं हे जाणून घेऊया...

तुळशी आणि दही

डॉक्टरांनुसार, दही आणि तुळशीची पाने हे  कॉम्बिनेशन जवळपास १०० आजारांवर रामबाण उपाय मानलं जातं. क्रोनिक डिजीज म्हणजे एखाद्या जुन्या आजारासाठी हा उपाय फार फायदेशीर मानला जातो. कारण याने तुमची इम्यूनिटी वाढते.

कसं तयार कराल मिश्रण?

२१ ते ३५ ताजी तुळशीची पाने घ्या, ३० ग्रॅम दही घ्या, या दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करा.

कधी कराल सेवन?

डॉक्टरांनी सांगितलं की, हे मिश्रण तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर सेवन करू शकता. नियमितपणे असं केल्याने तुमचं आजारी शरीर निरोगी होईल. ज्या लोकांना दही चालत नाही ते त्याऐवजी मधाचा वापर करू शकतात. वयानुसार याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. 

Web Title: Ayurveda doctor tells eating curd and tulsi leaf together prevent 100 diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.