किडनीतील सगळे विषारी पदार्थ बाहेर काढतात ही पाने, होणार नाही किडनी स्टोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:11 PM2023-08-09T13:11:54+5:302023-08-09T13:12:26+5:30
Natural Kidney Cleanse at Home: किडनी लघवीच्या माध्यमातून लघवीची नळी स्वच्छ करते. ज्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी असतो.
Natural Kidney Cleanse at Home: किडनी आपल्या शरीरातील फार महत्वाचा अवयव आहे. किडनीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जातात. तसेच किडनी रक्तातील अतिरिक्त पाणी आणि न पचणारे पदार्थही साफ करते. किडनी शरीरातून नायट्रोजन, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फेट बाहेर काढते.
किडनी लघवीच्या माध्यमातून लघवीची नळी स्वच्छ करते. ज्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी असतो. अनेकदा किडनीचं आरोग्य बिघडलं तर त्यांचं काम प्रभावित होतं किंवा हळूवार होतं. ज्यामुळे किडनीमध्ये विषारी पदार्थांच प्रमाण वाढतं. असं झालं तर तुम्हाला किडनी स्टोन, किडनीमध्ये इन्फेक्शन, क्रोनिक किडनी डिजीजसहीत अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.
किडनी निरोगी आणि मजबूत ठेवून त्यांचं काम वाढवण्यासाठी त्यांना स्वच्छ करणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की, तुमच्या आजूबाजूला मिळणाऱ्या झाडांची पानेच किडनीला आतून स्वच्छ करू शकते.
कोथिंबिरीची पाने
कोथिंबिरीची पाने लघवीच्या मार्गाचं आरोग्य फायदेशीर ठेवण्यास मदत करतं. यात बॅक्टेरिया मारण्याचे गुण असतात. जे किडनीला साफ करणं आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. यासाठी कोथिंबिरीची काही पाने धुवून घ्या आणि बारीक करा. एक कप पाणी उकडून घ्या आणि त्यात ही पाने टाका. मध्यम आसेवर 10 ते 15 मिनिटे उकडू द्या. हे मिश्रण थंड होऊ द्या मग गाळून प्यायल्याने किडनीचं आरोग्य चांगलं राहतं.
पारिजातची पाने
पारिजातची पाने किडनीसाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण यात बॅक्टेरिया मारणारे गुण असतात. जे किडनीचं आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. ही पाने बारीक करून याची रस प्यायल्याने फायदा होऊ शकतो.
तुळशीची पाने
तुळशीची पाने आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. हीच पाने किडनीसाठीही फायदेशीर ठरू शकतात. तुळशीच्या पानांचा काढा प्यायल्याने किडनी साफ होऊ शकते.
गोखरूची पाने
गोखरूची पाने लघवीच्या मार्गाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ही पाने किडनीमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. यासाठी गोखरूची काही पाने स्वच्छ करून एक कप पाण्यात उकडून घ्या. 5 ते 7 मिनिटांची हे पाणी थंड होऊ द्या. गाळून याचं सेवन करू शकता.